मुंबई, २३ एप्रिल- बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओलचं नावही नावाजलेल्या कलाकारांमध्ये घेतलं जातं. आता सनीने राजकीय क्षेत्रात आपलं नशीब तपासून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. सनी देओलने नुकताच भाजपात प्रवेश केला असून तो गुरदासपूर येथून यंदाची लोकसभा निवडणूक लढवेल असे म्हटले जात आहे.याआधी पंजाबमधील गुरदासपुर लोकसभा जागेचे प्रतिनिधित्व दिवंगंत अभिनेते विनोद खन्ना करत होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आणि काँग्रेसकडे ही जागा गेली.
VIDEO: अभिनेता सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश
सनी देओलचं बॉलिवूडमधलं स्टारडम तर प्रत्येकालाच माहीत आहे. पण खासगी आयुष्यात तो फार शांत आणि लाजाळू आहे. मितभाषी सनी आपल्या कुटुंबाला सर्वाधिक प्राधान्य देतो. यातही त्याच्याबद्दल सर्वात जास्त याच गोष्टीची चर्चा होते की, त्याचं आणि धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा यांचं नातं कसं असेल. हेमा आणि सनी दोघांमध्ये विस्तवही जात नाही असं म्हटलं जातं. पण याबद्दल स्वतः हेमा मालिनी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी सनीबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं होतं.
लोकसभा निवडणूक 2019- सनी देओलची भाजपमध्ये एण्ट्री, पंजाबच्या या जागेवरून लढवू शकतो निवडणूक
सनी देओल हा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा आहे. असं म्हटलं जातं की, प्रकाश कौर यांना धर्मेंद्र यांचं हेमा मालिनी यांच्यासोबतचं नातं कधीच मान्य नव्हतं. अशीच काही भावना सनी देओलचीही होती. मात्र खऱ्या आयुष्यात त्यांचं नातं कसं आहे याबद्दल हेमा मालिनी यांनी त्यांच्या बियाँड दी ड्रीम गर्ल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी सांगितलं.
हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘जेव्हाही गरज असते सनी नेहमी साथ देतो. जेव्हा २०१५ मध्ये गाडीचा अपघात झालेला तेव्हा मला पाहायला सर्वात आधी सनीच आला होता. तो सर्व गोष्टींची काळजी घेतो. ज्या पद्धतीने तो सर्व गोष्टी सांभाळतो यावरून त्याला आमचं नातं कसं आहे ते दिसतं.’
नवरा असावा तर असा! मिलिंद सोमणनं लग्नातील UNSEEN VIDEO केला शेअर
सनी आपल्या कुटुंबात भाऊ बॉबी देओलच्या फार जवळ आहे. बॉबीच्या करिअरबद्दल तो नेहमीच चिंताग्रस्त असतो. जेव्हा बॉबीला कोणीही सिनेमात घेत नव्हतं तेव्हा सनीने आपल्या भावासाठी सिनेमांची निर्मिती केली होती आणि त्यात बॉबीला काम दिले होते.
या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न
सनीचं खरं नाव अजय सिंग देओल असं आहे. त्याला घरात सगळे सनी नावाने हाक मारतात, त्यामुळे सिनेमांमध्ये येताना त्याने याच नावाचा वापर करण्याचं ठरवलं. सनीने स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं की तो लोकांशी बोलायला लाजतो तसेच तो वडिलांच्या फार जवळ आहे. घरात दोन व्यक्ती नसतील तर तो घरात राहूच शकत नाही. या दोन व्यक्ती त्याची पत्नी आणि मुलं नसून आई प्रकाश कौर आणि बाबा धर्मेंद्र हे आहेत.