'बिग बाॅस 11'फेम हिना खानकडचे 11 लाखांचे दागिने गेले कुठे?

बिग बॉसच्या 11व्या सीझनची उपविजेती हिना खान चांगलीच अडचणीत सापडलीय. एका ज्वेलरकडून घेतलेले 11 लाखांचे दागिने परत केले नसल्याने या ज्वेलरने तिच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2018 05:35 PM IST

'बिग बाॅस 11'फेम हिना खानकडचे 11 लाखांचे दागिने गेले कुठे?

मुंबई, 20 जुलै : बिग बॉसच्या 11व्या सीझनची उपविजेती हिना खान चांगलीच अडचणीत सापडलीय. एका ज्वेलरकडून घेतलेले 11 लाखांचे दागिने परत केले नसल्याने या ज्वेलरने तिच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केलीय. एका पुरस्कार सोहळ्यात घालण्यासाठी तिने हे दागिने घेतले होते. मात्र कार्यक्रमानंतर हे दागिने आपल्या स्टायलिस्टने हरवल्याचं हिनाने सांगितलंय. अखेर या ज्वेलरने तिच्याकडे दोन लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी केलीय. मात्र हिनाने ही रक्कम द्यायला ठाम नकार दिलाय.

हेही वाचा

Film Review : कसा आहे 'धडक'?

कोण आहे नवाजुद्दीनची ही मिस्ट्री गर्ल?

पहिली ब्लू फिल्म पाहिल्यावर सनी लिओननं काय केलं?

Loading...

'दादासाहेब फाळके पुरस्कारा'साठी हिनानं दागिने उधार घेतले होते. मात्र हा पुरस्कार सोहळा संपून बराच काळ लोटला मात्र तिनं अजूनही दागिने परत केले नाही असा आरोप ज्वेलर्सनं केला आहे. तिच्याकडे वारंवार दागिन्यांची मागणी करूनही तिनं ते परत केले नाही. हे दागिने आपल्या स्टाईलिस्टकडून हरवले असंही हिनानं सांगितलं. हे दागिने कायमस्वरूपी विसरून जा नाहीतर परिमाण वाईट होतील अशाही धमक्या हिनानं दिल्याचा आरोप ज्वेलर्सनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...