मुंबई, 12 सप्टेंबर : अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. तिचा चाहता वर्गही तसाच आहे. आपले फिटनेसचे आणि फॅशनचे फोटो, व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अनेकदा ती बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसते. तिचे चाहतेही बरेच आहे आणि याच चाहत्यांनी आपले फोटो, व्हिडीओ याशिवाय हिनाने आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं आपण सर्वांना 15 सप्टेंबरला एक मोठं सरप्राइझ देणार असल्याचं म्हटलं आहे.
हिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर या सरप्राइझची एक झलक दाखवली आहे. ज्यामध्ये ती ब्राइडल आउटफिट घालून आहे. तर तिच्यासह धीरज धूपर आहे जो ग्रुमच्या आउटफिटमध्ये दिसतो आहे. दोघांनीही रोमँटिक अशी पोझ दिली आहे.
हिना खानने हे जे पोस्टर शेअर केलं आहे, ते हमको तुम मिल गए (Humko Tum Mil Gaye) या गाण्याचं पोस्टर आहे. हिना खानने हे गाणं धीरज धूपरसह शूट केलं आहे. गाण्याचं फर्स्ट लूक हिनाने शेअर केला आहे. या फोटोत हिना आणि धीरज रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
हे वाचा - Baby Doll ची आणखी एक लक्झरी कार; सनी आणि गाडी दोन्ही पाहून म्हणाल HOT
या फोटोसह हिनाने लिहिलं आहे, 'हमको तुम मिल गए' 15 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याचा टिझर शनिवारी येणार आहे.
या गाण्याशी संबंधित एक फोटो हिनाने याआधीदेखील आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिची ही नवी पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना या गाण्याच्या टिझरची उत्सुकता आहे, शिवाय कधी एकदा हे गाणं रिलीज होतं असं झालं आहे. हिनाचे चाहते आता या गाण्याची प्रतीक्षा करत आहेत.