Home /News /entertainment /

Video : स्पृहा जोशीनं हनिमूनला नवऱ्याला सोडलं एका कोपऱ्यात आणि सुरू केलं हे काम, भन्नाट किस्सा

Video : स्पृहा जोशीनं हनिमूनला नवऱ्याला सोडलं एका कोपऱ्यात आणि सुरू केलं हे काम, भन्नाट किस्सा

अभिनेत्री स्पृहा जोशीनं नुकतिच हे तर काहीच नाही या शोमध्ये हजेरी लावली.यावेळी तिनं तिच्या हनिमूनचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

  Video : स्पृहा जोशीनं हनिमूनला नवऱ्याला सोडलं एका कोपऱ्यात आणि सुरू केलं हे काम, भन्नाट किस्सामुंबई, 13 जानेवारी- झी मराठीवरील (Zee Marathi) हे तर काहीच नाही (He Tar Kahich Nay Latest Episode ) हा कॉमेडी शो कमी वेळेत प्रेक्षकांच्या लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये मनोरंजन विश्वासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील एकापेक्षा एक असे भन्नाट किस्से शेअर केले आहे. प्रत्येक भागात हे तर काहीच नाही म्हणत प्रत्येकजण भन्नाट किस्सा सांगत हासवल्याशिवाय राहत आहे. या शोमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशीने( spruha varad joshi honeymoon) तिच्या हनिमूनचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या हनिमूनचा ( spruha  joshi honeymoon story) एक किस्सा सांगत आहे. ती म्हणाली की, आम्ही हनिमूनला केरळला गेलो होतो. त्यावेळी तयार होऊन आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. तेव्हा माझ्या आजूबाजूला मी पाहिले तेव्हा मला वाटलं की बहुतेक मी चुकीचे फ्लाईट किंवा चुकीचे ठिकणा निवडले आहे. कारण त्या फ्लाईटमध्ये सगळ्या महिलांच्या हातावर मेंहदी, हातात लाल चुडा व असे मोठे लोबंते कानातले व भांगात लाल कुंकू व खाली शॉर्ट घातलेले होते. मीपण असंच काहीसे केले होते. विशेष म्हणजे ती एका मराठी टूर कंपनीची हनिमून टूर होती. काहीवेळाने आम्ही ठिकानी पोहोचलो. तेव्हा सर्वांना समजले होते की, आपल्या फ्लाईटमध्ये स्पृहा जोशी आहे. मग काय खाली उतरताच माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी रांग लागली होती. त्यावेळी मी मात्र माझ्या नवऱ्याला हनिमूनला आले असताना देखी एका कोपऱ्यात सोडले आणि सेल्फी द्यायला सुरूवता केली....सर्वांना वाटलं यात काय नवल पण किस्सा तर पुढे आहे असं ती म्हणते.
  स्पृहा सांगते की, त्या फ्लाईटमध्ये प्रभुदेवा देखील होता. मला तो ओळखला होता पण बाकीच्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते..असं म्हणत ती म्हणते आता तुमच्या लक्षात आले असेल की, मी डान्सिंगचा देव प्रभुदेवा याला देखील बीट केले आहे. हे तर काहीच नाही ..कारण आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता तो देखील हे सगळे पाहत होता. विशेष म्हणजे त्याने माझ्या नवऱ्याला ट्रीपच्या पाचव्या दिवशी विचारले, सर ये मॅडम मुंबई में कोई बडी है...क्या...सर में उनको देखा ..ओ प्रभुदेवा उनको कोई नही देखा..सब इनको देख रहे थे..ये कोई बडा है क्या..यावर माझा नवरा देखील म्हणतो की, आता काय काहीच चॉईस नाही..स्पृहा जोशीनं असं म्हणताच सर्वजण जोरात हासू लागले. वाचा-'दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार...'; ठाकरे सरकारवर अभिनेत्याची कडक पोस्ट असा हा भन्नट किस्सा स्पृहा जोशीने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून देखील याला चांगली पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे तिनं हा किस्सा शेअर करताना सांगितले की, कुणाला जर हा किस्सा खोटो वाटला तर माझ्या नवऱ्याला याबद्दल फोन करून विचारू शकतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या