मुंबई, 12 डिसेंबर : कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. त्यांनी एका यूजरचं ट्विट रिट्विट करीत लिहिलं आहे की, 'भारताचा पाकिस्तान होऊ नये यासाठी सांभाळा'. एका यूजरने शेअर केलेल्या बातमीत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याजवळ पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड सापडलं आहे. कंगनाने या प्रकरणावरुन आपल्या ट्विटमध्ये संताप व्यक्त केला आहे.
कंगना म्हणाली...
यूजरने कंगनाला टॅग केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, कंगना बरोबर होती. शिवसेनाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरातून पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड सापडलं आहे. या ट्विटवर कंगनाने लिहिलं आहे की, जेव्हा मी म्हणाले होते की, मुंबई POK सारखी वाटते, तेव्हा यांनी माझं तोंड फोडण्याची धमकी दिली होती. भारतीयांनो त्यांना ओळखा जे सर्वकाही पणाला लावत आहेत आणि जे तुमचं सर्वकाही काढून घेत आहेत. ज्यांच्यावर तुमचा विश्वास करता तेच आपलं भविष्य ठरवतात. भारताचा पाकिस्तान होऊ नये यासाठी सांभाळायला हवं.
He had threatened to break my face when I had said Mumbai was feeling like POK. India recognise those who are staking everything for you and those who are taking everything from you. Where you place your faith their lies your future. India Pakistan na ban jaye sambhalo yaaron 🙏 https://t.co/3XdWF2m8vC
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 12, 2020
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांची चौकशी सुरू आहे. पण आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. CNN NEWS18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Pratap sarnaik, Shivsena