मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

त्याने घरी बोलावलं अन् बेडरूममध्ये केला बलात्कार; गायकाविरोधात FIR दाखल 

त्याने घरी बोलावलं अन् बेडरूममध्ये केला बलात्कार; गायकाविरोधात FIR दाखल 

पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट 'कागज' मध्ये 'जुग जुग जियो' सारख्या गाण्यांना आवाज देणारे गायक राहुल जैन (Rahul Jain) यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट : पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट 'कागज' मध्ये 'जुग जुग जियो' सारख्या गाण्यांना आवाज देणारे गायक राहुल जैन (Rahul Jain) याच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका फ्री-लान्स कॉस्टयूम स्टाइलिस्टने मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात  FIR दाखल केली आहे. 30 वर्षी स्टायलिस्टचा आरोप आहे की, राहुलने मुंबई स्थित आपल्या फ्लॅटमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे गायकाने हा आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. स्टायलिस्टने केला FIR... ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार, राहुलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क केला आणि तिच्या कामाचं कौतुक केलं. एका पोलीस अधिकाऱ्याने स्टायलिस्टच्या एफआयआरचा हवाला देत सांगितलं की, राहुलने तिला आपल्या अंधेरी स्थित फ्लॅटमध्ये येण्यास आणि आपली पर्सनल स्टायलिस्ट होण्यासाठी विनंती केली. एफआयआरनुसार, महिला 11 ऑगस्ट रोजी राहुल जैनच्या फ्लॅटवर गेली होती. राहुल तिला वस्तू दाखविण्याचं कारण सांगून आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. 'हा माणूस मला व्हिडीओ सेक्ससाठी ब्लॅकमेल करतोय'; उर्फी जावेदचा मोठा खुलासा, शेअर केला फोटो स्टाइलिस्टने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिने याचा विरोध केला तर राहुलने तिला मारहाण केली आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, राहुलने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, मी त्या महिलेला ओळखत नाही. तिने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्याविरोधात अशा प्रकारचा आरोप लावला होता. त्यावेळेसही मला न्याय मिळाला. गेल्या वर्षी एका गीतकार आणि रायटरने राहुल जैनच्या विरोधात बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात करणे आणि फसवणूक करण्याच्या कलमांतर्गत FIR दाखल केला होता. इंदूरचा राहुल जैनने 2016 मध्ये फीवर या चित्रपटातील गाणं तेरी याद..याने सुरुवात केली होती. त्याने 250 हून अधिक म्युझिकल ट्रॅक केले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood News, Rape, Singer

    पुढील बातम्या