मुंबई, 31 मार्च : फिल्मी जगात मोठ्या स्टार कलाकारांचे नखरे काही नवीन नाहीत. अनेक अटी शर्ती ठेवून ते सिनेमे साइन करतात त्यानंतर सेटवर गेल्यावरही त्यांचे नखरे झेलण्यात दिग्दर्शक आणि निर्मात्यांची वाट लागते. बॉलिवूडसाठी या गोष्टी बऱ्याच कॉमन आहेत. दिग्दर्शकांना अनेक वेळा नाईलाजानं अशा कलाकारांबरोबर काम करावं लागतलं. कलाकारांच्या नखऱ्या कंटाळून शुटींग करतात तर अनेक प्रकरण पुढे चर्चेचा विषय बनतात. अभिनेता राजेश खन्ना यांचा असाच एक किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. हाथी मेरे साथीच्या सेटवरील हा किस्सा बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.
हाथी मेरे साथी या सिनेमाच्या दिग्दर्शनाच्या धुरा प्रेम चोपडा यांच्या हाती होती. प्रेम चोपडा यांनी आपल्या पात्रांनी अनेकवेळा प्रेक्षकांना घाबरवलं आहे तर अनेक वेळा त्यांच्या या अवताराचा तिरस्कार देखील करण्यात आला आहे. प्रेम चोपडा यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यांनी राजेश खन्नाबरोबर अनेक सिनेमात काम केलं. एका मुलाखतीत प्रेम चोपडा यांनी राजेश खन्ना यांच्यासंबंधी असा एक किस्सा सांगितला होता की जो ऐकून सगळेच अवाक झाले.
हेही वाचा - भर रस्त्यात बंद पडली कार, गुंडांनी हेरून मीना कुमारीकडे केली 'ही' मागणी, सारेच झाले हैराण
1 मे 1971मध्ये हाथी मेरा साथी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं चांगलं यश कमावलं. सिनेमात राजेश खन्ना, तनूजा, मदन पुरी, सुजीत कुमार सारखे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सिनेमाचे निर्माते चिन्नपा वेळेचे पक्के होते. त्यांना योग्य वेळेत काम करणं आवडत होतं. पण राजेश खन्ना अनेक दिवस शुटींगसाठी उशिरा पोहोचत होते.
चिन्नपा राजेश खन्ना यांच्या या स्वभावाला वैतागले होते. राजेश खन्ना वेळेत यावेत यासाठी ते एका व्यक्तीला सकाळी 6 वाजता त्यांच्या घरी पाठवत होते. पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता. राजेश खन्ना सकाळी 11-12 वाजता शुटींगसाठी सेटवर येत होते. एकेदिवशी चिन्नपा यांनी राजेश खन्ना यांना धडा शिकवायचं ठरवलं.
राजेश खन्ना 11-12 वाजता हाथी मेरे साथीच्या सेटवर पोहोचले की निर्माते चिन्नपा एका व्यक्तीला बोलवायचे आणि त्याची सॉलिड धुलाई करायचे. त्याच्यावर चांगलेच चिडायचे आणि म्हणायचे, "तुला वेळेची किंमत नाहीये. मी तुला कमी पैसे देतो का? तरीही सेटवर उशिरा का येतोस?" चिन्नपा यांचा हा रुद्र अवतार पाहून राजेश खन्ना समजून गेले की हे सगळं त्यांच्यासाठी सुरू आहे. त्यांना अप्रत्यक्ष टोमणे मारले जात आहेत. त्यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांच्या आळशीपणाला रामराम केला आणि ते नेहमी ठरलेल्या वेळेत शुटींगसाठी सेटवर येऊ लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News