मुंबई, 8 डिसेंबर- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडून देखील या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. आता देखील अशा एका महान व्यक्तिने या कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक केलय ज्याने हे कलाकारा भारावून गेले आहे. ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून गानसम्राज्ञी लता मंगेशकर आहेत. या कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट लिहित याबद्दल माहिती दिली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आवर्जुन हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या चाहत्या आहेत. म्हणूनच या कार्यक्रमातील आवडत्या कलाकारांच्या अभिनयाचे त्यांनी कौतुक केले आहे. अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांना लता मंगेशकर यांनी खास भेटवस्तू पाठवली आहे. एवढच नाही तर या भेटवस्तूच्या कव्हरवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेश देखील लिहिला आहे.
वाचा : विकी-कतरीना बनणार अनुष्का-विराटचे शेजारी! नव्या घरात होणार अभिनेत्रीचा गृहप्रवेश
समीर आणि विशाखाने सोशल मिडीयावर त्याचा फोटो शेयर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चक्क लतादीदींकडून कौतुक आणि शुभेच्छारुपी भेटवस्तू आल्यानं आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी मिळाल्याची भावना समीरने व्यक्त केली. समीरने इन्स्टा पोस्ट करत लिहिले आहे की, "निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकर्षाने जाणवलं...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे." पुढे त्यांनी हास्यजत्रा टीमचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
विशाखाने लिहिले आहे की, काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले...घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक card होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक " क्षण "आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला ...!त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात..लता मंगेशकर...! त्या कायम हास्यजत्रा पाहतात, आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट.
View this post on Instagram
मी ठार झालेय खरंतर... देवा अजून काय हवयं...!ह्यासाठी मी कायम" महाराष्ट्राची हास्यजत्रा "ची आभारी असेन.आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते Sachin Goswami आणि Sachin Mote आणि सोनी मराठी चे देखील आभार... Amit Phalke, अजय भालवणकर, आणि आमची संपूर्ण जत्रेची टीमआणि ह्या यशात तुझ्याशिवाय सम्या ❤❤Samir Choughule काहीही शक्य नव्हतं..Thank u..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.