सैफ अली खान, डिंपल कपाडिया अशी तगडी स्टारकास्ट असल्यानं ‘तांडव’ (Tandav) या वेबसिरिजची (Web Series) ती प्रदर्शित होण्याआधीपासूनच जोरदार चर्चा होत होती.
मुंबई, 16 जानेवारी : सैफ अली खान, डिंपल कपाडिया अशी तगडी स्टारकास्ट असल्यानं ‘तांडव’ (Tandav) या वेबसिरिजची (Web Series) ती प्रदर्शित होण्याआधीपासूनच जोरदार चर्चा होत होती. त्याचे प्रोमो, टीझर बघून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. अली अब्बास जाफर दिग्दर्शित ही सिरीज शुक्रवारी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित झाली, पण आता ही वेबसिरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे या सीरिजबाबत वादंग निर्माण झाला असून, ट्विटरवर (Twitter) या मधील एका दृश्याबद्दल आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर ‘बॉयकॉट तांडव’ हा हॅशटॅग (#Boycott Tandav) वेगानं ट्रेंड होत आहे.
यामध्ये एक दृश्य आहे, ज्यात अभिनेता मोहमद झीशान अयुब जो रंगमंचावर भगवान शंकराची भूमिका साकारात आहे, त्याच्या तोंडी आझादी, व्हॉट द ...?. असा एक संवाद आहे. यातून हिंदू देवतांना लक्ष्य करून त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे ट्विटरवर ‘बॉयकॉट तांडव’ हा हॅशटॅग चालवण्यात येत असून, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारा आणि सीएए विरोधी आंदोलनात सहभागी असणारा अभिनेता अयुब यालाही ट्रोल केलं जात आहे.
I Unsubscribed Amazon Prime video after watching this anti hindu series #BoycottTandav
When will you realize that it's all about How to hurt Hindu sentiments using their gods and dharma and not about Entertainment at all. I want every Hindu to speak up on these issues... #BoycottTandavpic.twitter.com/76HFkCHnUW
हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची ही निर्मिती असून, 9 भागांची ही राजकीय मालिका (Political Drama) आहे. यात सैफ अली खान (Saif Ali khan), डिम्पल कपाडिया(Dimple Kapadia), सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहमद झीशान अयुब, कृतिका कामरा, सारा जेन डीयास, संध्या मृदुल, अनुप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा, शोनाली नागरानी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
यात सैफ अली खान समर प्रताप सिंग नावाच्या एका महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी राजकारण्याची भूमिका साकारत आहे, तर मोहमद झीशान अयुब समर प्रताप सिंगला आव्हान देणाऱ्या शिवा शेखर नावाच्या पुरोगामी विद्यार्थी नेत्याची भूमिका साकारत आहे.