मराठा मंदिरमध्ये 'डी.डी.एल.जे'चे शो सुरूच राहणार

मराठा मंदिरमध्ये 'डी.डी.एल.जे'चे शो सुरूच राहणार

हसीना पारकर या नव्या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग मराठा मंदिरमध्ये ठेवलं जाणार असल्यामुळे एक दिवसाचा शो कॅन्सल करण्यात आला आहे.

  • Share this:

21जुलै : 1995 पासून मराठा मंदिरमध्ये चालू असलेला 'डी.डी एल.जे'चा शो हसीना पारकरमुळे रद्द करण्यात आलाय. हसीना पारकरच्या स्क्रिनिंगमुळे डी.डी.एल.जे.चा एक शो रद्द केला आहे. पण कायम स्वरुपी डीडीएलजेचा शो काही कायमचा बंद होणार नाही.

हसीना पारकर या नव्या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग मराठा मंदिरमध्ये ठेवलं जाणार असल्यामुळे एक दिवसाचा शो कॅन्सल करण्यात आला आहे. मराठा मंदिर थिएटर डोंगरी भागाच्या जवळ आहे. हा डोंगरी भाग दाऊद इब्राहिमचा इलाका म्हणून ओळखला जायचा. याच भागात दाऊद आणि त्याची बहीण हसीना लहानाचे मोठे झाले. हसीना पारकर हा दाऊदच्या बहिणीच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे आणि म्हणूनच हसीना पारकरचं स्क्रिनिंग मराठा मंदिरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सिनेमात श्रद्धा कपूर भूमिकेत असून हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

First published: July 21, 2017, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading