मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सपना चौधरीने जानेवारीमध्येच लपूनछपून उरकलं लग्न, ऑक्टोबरमध्ये दिली गोड बातमी

सपना चौधरीने जानेवारीमध्येच लपूनछपून उरकलं लग्न, ऑक्टोबरमध्ये दिली गोड बातमी

हरियाणवी डान्सर (Haryanvi Dancer) ते रिअॅलिटी शो असा प्रवास करणाऱ्या सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) चाहत्यांसाठी खूशखबर आहे.

हरियाणवी डान्सर (Haryanvi Dancer) ते रिअॅलिटी शो असा प्रवास करणाऱ्या सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) चाहत्यांसाठी खूशखबर आहे.

हरियाणवी डान्सर (Haryanvi Dancer) ते रिअॅलिटी शो असा प्रवास करणाऱ्या सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) चाहत्यांसाठी खूशखबर आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 07 ऑक्टोबर : हरियाणवी डान्सर (Haryanvi Dancer) ते रिअॅलिटी शो असा प्रवास करणाऱ्या सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) चाहत्यांसाठी खूशखबर आहे. बिग बॉसमध्ये तिने खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर सपना तिच्या बदलेल्या लुकसाठी चर्चेत आली होती. तिच्या डान्सचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशी बातमी समोर येत आहे की, सपनाने 4 ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचप्रमाणे तिने जानेवारीमध्ये तिचा बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) याच्याशी लग्न देखील केले आहे. दरम्यान याबाबत सपना किंवा वीर कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही आहे. काही मीडिया अहवालांच्या मते सपनाच्या आई नीलम चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. तिने आजी झाल्याचा आनंद देखील व्यक्त केला आहे.

सपना सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते पण तिने कधी तिच्या आणि वीरच्या नात्याबाबत भाष्य केले नाही आहे. वीर साहू हा हरियाणवी गायक आहे. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असतात.

'हरियाणा का बब्बू' या नावाने वीर साहू प्रसिद्ध आहे. तो गायक आणि अभिनेता देखील आहे. मात्र अद्याप त्याच्या गाण्यांना विशेष अशी प्रसिद्धी मिळाली नाही आहे. त्याने काही म्यूझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे.

(हे वाचा-ड्रग्ज प्रकरणानंतर बाप-लेकीत दुरावा? साराविषयी सैफची अशी प्रतिक्रिया)

याआधी त्या दोघांच्या नावाची चर्चा झाली होती, त्यावेळी वीर साहूने फेसबुक लाइव्ह करत याबाबत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. पण त्याने सपनाचे नाव घेतले नव्हते. त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे लग्नाबाबत काही ठरवले नसल्याचेही तो म्हणाला होता.

सपना चौधरीप्रमाणेच वीर साहूने देखील अभिनय आणि संगीतासाठी एमबीबीएसचे शिक्षण मध्येच सोडले आहे. 'गांधी फिर आ गए' या पंजाबी सिनेमात देखील त्याने काम केले होते.

First published:

Tags: Bigg boss