Home /News /entertainment /

कंगनावरुन भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली; आता BJP ने केली सुरक्षेची मागणी

कंगनावरुन भाजप-शिवसेनेमध्ये जुंपली; आता BJP ने केली सुरक्षेची मागणी

कंगनाच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी सामनातून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला काय होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    मुंबई, 5 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका ट्वीटमध्ये मुंबईची तुलना PoK सोबत केली होती. ज्यानंतर राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते अभिनेत्री विरोधात जोरदार प्रदर्शन करीत आहे. कंगनाने दावा केला आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिला मुंबईला परतण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी सांगितले की, पोलिसांनी कंगणाची सुरक्षा करायला हवी. यापुढे ते (भाजप नेते) म्हणाले, कंगना रणौतला पोलिसांची सुरक्षा मिळायला हवी. तिला स्वतंत्रपणे सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात खुलासा करण्याची परवानगी द्यावी. जेव्हा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, कंगना रणौतच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. यानंतर विज यांनी मागणी केली आहे. सरनाईकांनी सांगितल्यानुसार संजय राऊत यांनी सल्ला दिला आहे की , जर कंगना 9 सप्टेंबर रोजी मुंबईत आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता तिचा शिवसेना पद्धतीने समाचार घेतील. शिवसेना आमदारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. हे ही वाचा- कंगनाला 9 तारखेला येऊ तर द्या.. शिवसेनेचा सज्जड इशारा, काय म्हणाले संजय राऊत कंगनाला उत्तर देत संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रात लिहिले आहे की आम्ही त्यांना निवेदन करतो की मुंबईत येऊ नये. यातून दुसरं काही नाही मात्र मुंबई पोलिसांचा अपमान होईल. गृहमंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी. कंगना रणौत पीएम नरेंद्र मोदी आणि भाजपची समर्थक आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ती सातत्याने महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि बॉलिवूडवर हल्लाबोल करीत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Kangana ranaut

    पुढील बातम्या