Home /News /entertainment /

VIDEO - बाळाबाबत पती Haarsh limbachiyaa ने केली अशी भविष्यवाणी; Bharti Singh झाली शॉक

VIDEO - बाळाबाबत पती Haarsh limbachiyaa ने केली अशी भविष्यवाणी; Bharti Singh झाली शॉक

फोटो सौजन्य - विरल भयानी इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य - विरल भयानी इन्स्टाग्राम

कॉमेडियन भारती सिंहचा (Bharti Singh) नवरा हर्ष लिंबाचियाने (Harsh limbachiyaa) बाळाबाबत सर्वांसमोर असं काही सांगितलं की सर्वजण हैराण झाले.

मुंबई, 23 जानेवारी : हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह (Bharti Singh) लवकरच आई होणार आहे. भारतीने हर्ष लिंबाचिया (Harsh limbachiyaa)याच्याशी 2017 साली लग्न केलं. लग्नानंतरही भारतीने आपल्या कामात खंड पडू दिला नाही हे विशेष. भारतीचे चाहते संपूर्ण देशभरात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम त्यांना भेटत असते आणि कायम चर्चेत असते. सध्या पुन्हा एकदा भारती आणि तिचा पती एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत (Bharti Singh haarsh limbachiyaa video). भारती सध्या गरोदर आहे आणि या गरोदरपणातही तिनं आपलं काम थांबवलं नाही ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. ती कलर्स टीव्हीवरच्या 'हुनरबाज' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहे. अशात भारतीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती 'पुष्पा' चित्रपटातला हिरो अल्लू अर्जुनची स्टाईल मारत डायलॉग मारताना दिसते. 'मी पुष्पराज. बाळ झालं, तरीही मी थांबणार नाही,' असं भारती म्हणजे. त्यानंतर तिचा नवराही इतका जोशात येतो की तिच्या या डायलॉगनंतर तोसुद्धा याच स्टाईलने एक डायलॉग मारतो. जो ऐकून भारतीही शॉक होते. "मी पण थांबणार नाही. पुढच्याच वर्षी अजून एक बाळ देईन,' असं हर्ष म्हणतो. हे वाचा - प्रियांका चोफ्राच्या गुड न्यूजवर मिनी माथुरने केलं आश्चर्य व्यक्त तर कतरिनाने... दोघांचं हे संभाषण ऐकून उपस्थित पत्रकारांना आपलं हसू आवरलं नाही. यावर भारतीची प्रतिक्रिया फारच मस्त होती. तिने एकदम आश्चर्यचकित होऊन हर्षकडे बघितल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.
नुकताच 'हुनरबाज' या शोचा एक प्रोमो चॅनलने प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये हर्ष मिथुन चक्रवर्तीला म्हणतो, "प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये मला टोमणे मारले जायचे, लग्नाला 4 वर्षं झाली आणि बाळ कधी होणार. मिथुन दा तुम्हीसुद्धा मला टोमणा मारला होता एकदा..." यावर भारती लगेच उत्तर देते, "तुमच्या टोमण्यांमुळे त्यानं सगळं टॅलेंट माझ्यासमोर दाखवलं..!" त्यांची ही नोकझोक बघून मिथुन चक्रवर्तीपण स्वतःचं हसू आवरू शकले नाहीत आणि त्यांनी या कॉमेडी कपलला खूप शुभेच्छा दिल्या. हे वाचा - विराट कोहलीला ‘कॉमेडी नाईट..’ पाहणं पडलं होतं महागात; लाखाचं आलं बिल भारतीने आपण 2020 मध्येच बाळाचं प्लॅनिंग करत असल्याचं सांगितलं होतं; पण कोरोनामुळे तिनं ते पुढं ढकललं. भारती या वर्षी एप्रिलमध्ये बाळाला जन्म देणार आहे.  डिसेंबर महिन्यातच भारती आणि हर्षने त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. दोघांच्याही लग्नाला माध्यमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भारती कायम सोशल मीडियावर हर्षसोबतचे फोटो शेअर करत असते. ते फोटोज बघून चाहते त्या दोघांचंही खूप कौतुक करतात.
First published:

Tags: Actress, Entertainment, Pregnancy

पुढील बातम्या