Harivansh Rai Bachchan Birth Anniversary: सुप्रसिद्ध कविता ज्यांनी मोठ्या पडद्यावर केली जादू, आजही ओठांवर आहेत ही गाणी

Harivansh Rai Bachchan Birth Anniversary: सुप्रसिद्ध कविता ज्यांनी मोठ्या पडद्यावर केली जादू, आजही ओठांवर आहेत ही गाणी

हरिवंशराय यांचं मूळचं आडनाव श्रीवास्तव (Shrivastava) होतं पण त्यांनी हिंदी कविता लेखन सुरू केल्यावर बच्चन (Bachchan) हे टोपणनाव घेतलं होतं. हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कालांतराने त्यांच्या कविता हिंदी चित्रपटांत गाणी म्हणून वापरल्या गेल्या.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपण महान अभिनेते म्हणून ओळखतो. पण भारतातील सर्वांत महान कवींपैकी एक असलेल्या दिवंगत हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचे पुत्र अशीही बिग बींची ओळख आहे. हिंदीतील साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 ला तत्कालीन युनायटेड प्रोव्हिन्स ऑफ आग्रा अँड औध म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशातील बाबूपट्टी (Babupatti, UP) या ठिकाणी झाला. मधुशाला (Madhushala) या त्यांच्या कवितेसाठी हरिवंशराय बच्चन सर्वांच्या स्मरणात राहिले आहेत. अनेकदा अमिताभ यांनी सादर केलेली ही कविताही ऐकली असेल.

हरिवंशजींनी सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन (Teji Bachchan) यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला अजिताभ (Ajitabh Bachchan) आणि अमिताभ ही दोन मुलं झाली. हरिवंशराय यांचं मूळचं आडनाव श्रीवास्तव (Shrivastava) होतं पण त्यांनी हिंदी कविता लेखन सुरू केल्यावर बच्चन (Bachchan) हे टोपणनाव घेतलं होतं. हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कालांतराने त्यांच्या कविता हिंदी चित्रपटांत गाणी म्हणून वापरल्या गेल्या. हरिवंशराय बच्चन यांच्या काही कविता ज्यांची गाणी झाल्यानी त्या अजरामर झाल्या.

रंग बरसे भीगे चुनर वाली (Rang Barse Bheege Chunar Wali) : अमिताभ बच्चन यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या चित्रपटांपैकी एक सिलसिलामध्ये हे गाणं होतं. अनेक दशकं उलटली तरीही होळीच्या उत्सवाचं चित्रण असलेलं हे गाणं आजही ताजंतवानं आहे. या चित्रपटात बच्चन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि रेखा यांनी भूमिका साकारल्या होत्या.

अग्निपथ (Agneepath) : एखाद्याच्या आयुष्यातील संघर्षपूर्ण वाटचालीचं वर्णन करणारी हरिवंशरायांची अग्निपथ ही कविता प्रचंड गाजली. 1990 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन अभिनित अग्निपथ या संपूर्ण चित्रपटात या कवितेचा वापर करण्यात आला होता.

कोई गाता मैं सो जाता (Koi Gaata Mai So Jata) : 1977 मध्ये आलेल्या अमिताभ यांच्या अलाप या चित्रपटातील हे येशूदासांच्या आवाजातलं गीत खूप लोकप्रिय झालं. निश्चिंत झोपेसाठी तळमळणाऱ्या माणसाच्या भावना या गाण्यातून मांडल्या आहेत.

(वाचा - पत्नीने फसवणुकीची दिली भयानक शिक्षा; पतीला पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकलं)

साँझ खिले भोर झरे (Saanjh Khile Bhor Jharey) : 1971 मध्ये आलेल्या फिर भी या चित्रपटात हे गाणं होतं. ज्येष्ठ गायक हेमंत कुमार आणि त्यांची मुलगी राणु मुखर्जी यांनी हे गाणं गायलं होतं. एका आनंदी कुटुंबाच्या जुन्या आठवणींत रमलेली मुलगी या गाण्यात दाखवलेली होती.

मधुशाला (Madhushala) : मधुशाला या कवितेचं चित्रपटगीतात रूपांतर झालं नसलं तरीही ही कविता मन्ना डेंपासून अनेक दिग्गज गायकांनी गायली आहे. एका व्यक्तीचा त्याच्या घरापासून मदिरालयापर्यंतचा प्रवास या कवितेतून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे हरिवंशराय बच्चन यांनी दारू कधीच प्यायली नाही तरीही त्यांनी दारुड्या व्यक्तीच्या भावना या कवितेतून अप्रतिम व्यक्त केल्या आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: November 27, 2020, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading