लता मंगेशकरांच्या सल्ल्याकडे केलं होतं दुर्लक्ष; त्या चूकीसाठी हरिहरन आजही मागतायेत माफी

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल करिअरच्या सुरुवातील त्यांनी चक्क लता मंगेशकरांचा सल्ला धुडकावून लावला होता. अन् त्या चूकीसाठी ते आजही लतादीदींची माफी मागतात. अशी कुठली चूक त्यांनी केली होती?

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल करिअरच्या सुरुवातील त्यांनी चक्क लता मंगेशकरांचा सल्ला धुडकावून लावला होता. अन् त्या चूकीसाठी ते आजही लतादीदींची माफी मागतात. अशी कुठली चूक त्यांनी केली होती?

  • Share this:
    मुंबई 3 एप्रिल: आपल्या अनोख्या आवाजानं रसिकांना अवाक् करणाऱ्या जेष्ठ संगीतकार हरिहरन (Playback Singer Hariharan) यांचा आज वाढदिवस आहे. 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हरिहरन यांचा जन्म 3 एप्रिल 1955 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. मात्र तरी देखील त्यांनी आपल्या अफाट मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं. बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल करिअरच्या सुरुवातील त्यांनी चक्क लता मंगेशकरांचा सल्ला धुडकावून लावला होता. अन् त्या चूकीसाठी ते आजही लतादीदींची माफी मागतात. अशी कुठली चूक त्यांनी केली होती? आज ते बॉलिवूडमधल्या (Bollywood) यशस्वी ज्येष्ठ गायकांपैकी एक आहेत. पण जेव्हा ते या क्षेत्रात नवीन होते तेव्हा त्यांनी एक चूक केली होती त्यामुळे त्यांना आयुष्यभराचा धडा मिळाला होता. एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला. हरिहरन यांना पहिल्यांदाच गानकोकिळा लतादीदींबरोबर गाण्याची संधी मिळाली होती. ते बंगालमधल्या (Bengal) एका मोठ्या संगीतरजनीत गात होते. हरिहरन पहिल्यांदाच लतादीदींसोबत स्टेजवर गाणार होते. ‘ये रात भिगी भिगी’ हे ड्युएट गाणं सादर करण्यापूर्वी लतादीदींनी (Lata Mangeshkar) हरिहरन यांना एक सल्ला दिला होता. त्या म्हणाल्या, ‘हरी तू पहिल्यांदाच गातो आहेस गाताना जास्त वर किंवा श्रोत्यांकडे पाहू नकोस. आता एखाद्यानं काही करू नको सांगितलं तर माणूस मुद्दाम तेच करतो.’ ते पुढे म्हणाले, ‘लतादीदींनी सल्ला दिल्यानंतरही मी त्याकडे काणाडोळा केला आणि गाताना वर बघितलं. समोर जवळजवळ 1 लाख श्रोते बसले होते. मग काय ते पाहिल्यावर गाण्याच्या अंतऱ्यामध्ये माझी चूक झाली. दोन मिनिटांनी मी लतादीदींकडे पाहिलं तेव्हा त्या हळूच हसत होत्या. त्यांच्या मनात भाव होते म्हणूनच तुला आधी कल्पना दिली होती. कशाला श्रोत्यांकडे पाहिलंस.’ या चुकीमुळे हरिहरन यांना आयुष्यभराचा धडा मिळाला. अवश्य पाहा - ‘तो मी नव्हेच….’; एजाज खानमुळं या अभिनेत्यावर होतोय ड्रग्ज घेतल्याचा आरोप हरिहरन यांनी गमन या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून कारकीर्द सुरू केली. 'अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों' हे त्यांचं पहिलं गाणं. ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत त्यांनी 1992 मध्ये काम करायला सुरुवात केली. बॉम्बे या गाजलेल्या प्रेमकथेमधलं त्यांचं ‘तू ही रे’ हे गीत अजूनही सर्व पिढ्यांना भावतं. हरिहरन यांनी कर्नाटक, हिंदुस्थानी शास्रीय, गझल, पॉप या सर्व प्रकारांची आणि हिंदी, मराठी, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हरिहरन यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
    First published: