मुंबई 18 एप्रिल: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. त्यांनी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 13 धावांनी पराभव केला. खरं तर या सामन्यात मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी कमाल केली. मात्र तरी देखील हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानं या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला (David Warner) रनआऊट केलं. अन् हा रनआऊट पाहून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग देखील थक्क झाला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन आपला आनंद व्यक्त केला आहे.
डेव्हिड वॉर्नर हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यानं या सामन्यात 34 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. दरम्यान तो आक्रमक रुप धारण करण्याच्या पवित्र्यात होता. तेवढ्यात एक चोरटी धाव घेताना हार्दिक पांड्यानं त्याला रन आऊट केलं. या विकेटमुळं मुंबई हा सामना जिंकणार हे जवळपास पक्क झालं होतं. अन् त्याच्या या रनआऊटवर रणवीरनं स्तुतीसुमनं उधळली आहे. ऑन द मनी इन द क्लच On the money, in the clutch असं म्हणत त्यानं कौतुक केलं आहे. याचा अन्वयार्थ मिळालेल्या पैशांची हार्दिकनं परतफेड केली असा होतो. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
— Maqbool (@im_maqbool) April 18, 2021
अवश्य पाहा - ‘सामान्य माणूस घरात मग क्रिकेटपटू बाहेर कसे?’; राखी सावंत IPL वर संतापली
मुंबईच्या 151 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या 57 धावा फलकावर लागल्या होत्या. त्यानंतर फिरकीपटू कृणाल पंड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो 8व्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त 2 धावाच करता आल्या. त्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12व्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पंड्याने यष्ट्यांवर आपला अचूक थ्रो मारत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली. यानंतर मात्र, हैदराबादच्या डावाला उतरती कळा लागली. मधल्या फळीत विजय शंकरने थोडा प्रतिकार केला. मात्र डावाच्या शेवटी तोही दबावात बाद झाला. मुंबईकडून राहुल चहरने अप्रतिम फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन करत 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय, बोल्टलाही 3 बळी घेता आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, David warner, Hardik pandya, IPL 2021, Marathi entertainment, Ranveer singh, Rohit sharma, Sports