हार्दिक पांड्याची विकेट घेणारी नताशा आहे तरी कोण ?

हार्दिक आपल्या या गर्लफ्रेंड बद्दल खूपच गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

भारताचा अष्टपैलू खेळडू हार्दिक पांड्याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तो लिसा हेडन सोबत लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसल्यानं चर्चेत आला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिक चर्चेचा विषय बनला आहे ते त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे. नच बलिए 9 ची स्पर्धक नताशा स्‍टानकोविक (Natasha Stankovic) ला पांड्या डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

उर्वशी रौतेला, एली एवराम आणि ईशा गुप्‍ता यांच्यांनंतर आता हार्दिक पांड्याचं नाव नातशासोबत जोडलं जात आहे. नताशा हार्दिक आणि कृणाल यांना सोशल मीडियावर फॉलो करते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हार्दिकनं आपल्या कुटुंबीयांशी नताशाची ओळख करुन दिली. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या पार्टीमध्ये हार्दिक नताशासोबत पोहोचला होता. ज्याठिकाणी त्याचा भाऊ कृणाल आणि वहिनी सुद्धा हजर होते.

नताशा ही मॉडेल असून ती मूळची सार्बियाची आहे. याआधी ती बॉलिवूड रॅपर बादशाह याच्या डिजेवाले बाबू या आयटम साँगमध्ये दिसली होती.

हार्दिकच्या अगोदर नताशा टीव्ही अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि ते वेगळे झाले मात्र आजही ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

नताशा सर्वात आधी बिग बॉसच्या 8 व्या सीझन मध्ये दिसली होती. त्यानंतर तिला आयटम साँगची ऑफर मिळाली आणि डिजेवाले बाबू या गाण्यमुळे ती प्रकशझोतात आली.

हार्दिक आपल्या या गर्लफ्रेंड बद्दल खूपच गंभीर असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी तो 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

सध्या नताशा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीसोबत नच बलिए 9 मध्ये परफॉर्म करत आहे. या दोघांनीही एक्स कपल म्हणून या शोमध्ये भाग घेतला आहे. ते वेगळे झाले असले तरीही त्यांच्यातील मैत्री संपलेली नाही हे त्यांच्या सेटवरील बॉन्डिंगवरून दिसून येतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या