मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hardeek Akshaya Sangeet: अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या संगीत सोहळ्यातील गोड क्षण; पाहा VIDEO

Hardeek Akshaya Sangeet: अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या संगीत सोहळ्यातील गोड क्षण; पाहा VIDEO

हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर

हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 डिसेंबर : राणा दा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफमध्येही एकमेकांशी लग्न करणार आहेत. सध्या हार्दिक आणि अक्षयाच्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. सोशल मीडियावर सगळीकडे त्यांच्याच लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. लाडका राणादा आणि अंजलीबाईं लग्न करणार म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाची सीमाच उरली नाही. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला. त्यांच्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता त्यांचे संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दोघांनीही त्यांचं संगीत खूप एन्जॉय केलेलं पहायला मिळतंय. संगीत सोहळ्यात अक्षयाने ऑफ शोल्ड गाऊन घातला असून हार्दिकने जॅकेट-सूट घातला आहे. दोघेही या कॉस्ट्यूममध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत असतात. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हिट ठरलेल्या जोडीने साखरपुडा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांचं केळवण, मेहंदी, हळद पार पडली आहे. आणि नुकताच संगीत सोहळाही पार पडली. हार्दीक आणि अक्षया हे पुण्याच्या प्रसिद्ध ढेपे वाड्यात शाही विवाह सोहळा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही लग्नाच्या नवनवीन अपडेट समोर येत आहे.

दरम्यान, झी मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीने तर सगळ्यांचीच मने जिंकली. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाविषयीची अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो व्हिडीओ ट्रेंड होत असलेले पहायला मिळतायेत.

कधी एकदा दोघे लग्न करतायेत असं चाहत्यांना झालंय. प्रत्येक पोस्टवर चाहते लग्नाविषयीच विचारताना दिसतायेत. त्यामुळे हे बहुप्रतिक्षित लग्नसोहळा कधी पार पडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.

First published:

Tags: Actor, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Wedding