मुंबई, 02 डिसेंबर : प्रेक्षकांचे लाडके राणा दा आणि अंजली बाई म्हणजेच अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर काही तासात लग्नबंधनात अडकतील. पुण्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. नुकतीच दोघांची हळद पार पडली. त्यानंतर संगीत सोहळाही दणक्यात पार पडला. लग्नाची जोरात तयारी सुरू असताना मात्र अक्षयाच्या घरी भावुक वातावरण पाहायला मिळालं. लेकीला सासरी पाठवताना इतर बापांप्रमाणे अक्षयाचे बाबा देखील भावुक झाले. बाप लेकीचा हळवा क्षण कॅमेरात कैदर करण्यात आलाय. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दीकच्या घरची हळद मुंबईत पार पडली आणि त्यानंतर 1 डिसेंबरला दोघांची पुण्यात एकत्र हळद करण्यात आली. दोघांनी हळदीसाठी खास पंजाबी स्टाइल कॅरी केली होती. अक्षया देखील सुंदर दिसत होती. हळदीसाठी छान सजलेल्या अक्षयाला नवरीच्या रुपात पाहून तिच्या बाबांना अश्रू अनावर झाले. लेकीला मिठीत घेऊन ढसाढसा रडले. दोघांचा हा भावुक क्षण पाहून उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले. दोघांचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर देखील कमेंट करत अनेकांनी बाप लेकीच्या नात्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
हेही वाचा - Akshaya-Hardeek Love Story : आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती अक्षया; मग असा रंगला हार्दीकवर जीव
View this post on Instagram
अक्षया आणि हार्दीक 2 डिसेंबरला पुण्यात लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाचा वेगळाच थाट पाहायला मिळत आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत धुमधडाक्यात दोघांचं लग्न लागणार आहे. दोघांचं लग्न पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्साही आहेत. ऑनस्क्रिन जोडी आणि आयुष्यभरासाठी एकत्र येणार असल्यानं चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
राणा आणि पाठक बाईंचं लग्न म्हणजे मोठा उत्साह पाहायला मिळतोय. लग्नाच्या पत्रिकेपासून हातावरच्या मेहंदी पासून सगळे युनिक पद्धतीनं करण्यात आलं आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तर अक्षयाच्या हातावरच्या मेहंदीचीही चर्चा आहे. नवरा नवरी ते सप्तपदी तिनं मेहंदीमध्ये काढले आहेत. तसंच नखांवर लग्नाची तारीख कोरली आहे.
आता अखेर दोघे लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.