मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hardeek-Akshaya Wedding : हार्दीकच्या पिरमान येडी झाली अक्षया; हळदीच्या आधी झाली होती अशी अवस्था

Hardeek-Akshaya Wedding : हार्दीकच्या पिरमान येडी झाली अक्षया; हळदीच्या आधी झाली होती अशी अवस्था

अक्षया देवधर हार्दीक जोशी

अक्षया देवधर हार्दीक जोशी

हळदीच्या दिवशी अक्षयाची झालेली अवस्था कॅमेरात टिपण्यात आली आहे. अक्षयाचा हळदीच्या आधीच्या आधीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,10 डिसेंबर : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील ऑनस्क्रिन जोडी नुकतीस ऑफस्क्रिन देखील एकमेकांची झाली ते म्हणजे अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. दोघांनी 2 डिसेंबरला पुण्यात लग्न केलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा आजही सुरू आहेत. लग्नाचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळपास 5 वर्ष एकत्र काम केल्यानंतर आता हार्दीक आणि अक्षया यांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. लग्नात दोघांनी चांगलीच धम्माल केली. मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन सगळं साग्रसंगीत पार पडलं. नवरी अक्षया तर हार्दीकच्या प्रेमात पार वेडी झाली होती. नव्या नवरीची लाली चेहऱ्यावर तर दिसतच होती पण अक्षयाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात हळदीच्या आधी अक्षयाची कशी अवस्था झाली होती ते पाहायला मिळत आहे.

हार्दीत आणि अक्षया यांनी पुण्यात एका रिसॉर्टमध्ये लग्न केलं. दोघांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी लग्नाला हजर झाले होते. लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी दोघांनी खास ड्रेस डिझाइन केले होते. अक्षयाचा मेहंदी लुक सर्वांना आवडला. त्यानंतर हळदीला देखील दोघांनी सफेद रंगाचे आऊटफिट्स चॉइस केले होते. हळद लागण्याआधीच अक्षया हार्दीकला भेटण्यासाठी खूप आतूर झाली होती. हळदीच्या काही वेळ आधी तिची झालेली अवस्था व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -  Hardeek Akshaya : कुठं कुठं जायचं हनिमूनला! राणा अंजली कुठे जाणार फिरायला? ही आहेत ठिकाणं

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अक्षयानं हळदीचा सफेद ड्रेस घातला आहे. फुलांची खास ज्वेलरी, मस्त हेअरस्टाइलनंतर अक्षयाचा मेकअप सुरू होता. तेव्हा ती डोळे मिटून शांतपणे एक गाणं गुणगुणताना दिसत आहे. डोळे मिटून फक्त हार्दीकला इमॅजिन करणाऱ्या अक्षयाचा व्हिडीओ सर्वांना आवडला आहे. एकीकडे मेकअप सुरू असताना दुसरीकडे अक्षया 'कजरा मोहब्बत वाला' हे गाणं तिच्या स्टाइलनं म्हणताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये अक्षयाला जेव्हा कळलं की तिचा व्हिडीओ शुट होतोय तेव्हा तिनं कॅमेरात दिलेल्या क्यूट लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अक्षयाचा हाच व्हिडीओ नाही तर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हार्दीकसाठी घेतलेल्या स्पेशल उखाण्याचा व्हिडीओही सध्या ट्रेंड होत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial