हरभजन होणार 'गायक'

हरभजन होणार 'गायक'

हे गाणं डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

  • Share this:

09जुलै : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना हैराण करणारा हरभजन आता आपल्या स्वरांनी लोकांना घायाळ करणार आहे. मिथुन नावाच्या संगीतकारासोबत मिळून तो एक गाणं गाणार आहे. हे गाणं डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

मिथुन आणि हरभजन हे दोघंही चांगले मित्र आहेत. एक तरी गाणं गायची आपली इच्छा त्यानं मिथुनकडे अनेकदा व्यक्त केली होती. पण हरभजनला कुठलं साधंसुधं गाण गायचं नव्हतं. तर देशातल्या सामान्यांच्या असामान्यांची ,देशाचं भलं करणाऱ्या लोकांची गाथा गाणारं गाणं त्याला गायचंय.'संगीताला कायम काहीतरी ध्येय असावं' असं हरभजनचं म्हणणं आहे.

या गाण्याच्या व्हिडिओचं शूटिंग देशातल्या अनेक राज्यांमध्ये होणार आहे.हे गाणं हिंदी आणि इंग्लिशमध्ये तो गाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading