मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sayali Sanjeev : 'मला हवा आहेस तू...' 'या' खास व्यक्तीसाठी सायली संजीवची भावुक पोस्ट

Sayali Sanjeev : 'मला हवा आहेस तू...' 'या' खास व्यक्तीसाठी सायली संजीवची भावुक पोस्ट

सायली संजीव

सायली संजीव

सध्या सायली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. आता तिने आयुष्यातील एका महत्वाच्या व्यक्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 30 नोव्हेंबर :  मराठीतील गुणी अभिनेत्री असं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सायली संजीवचं नाव समोर येईल. मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल  ठेवलेल्या सायलीने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट, वेब स्टोरीज अशा सगळ्या माध्यमांत तिने काम केलं आहे. सायली लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सायली तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. गेल्या वर्षी सायलीच्या वडिलांचं निधन झालं. ती कायम तिच्या वडिलांच्या आठवणी शेअर करत असते. आजही तिने याबाबत एक पोस्ट केली आहे.

अभिनेत्री सायली संजीव नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडमुळे तरी कधी तिच्या फोटोशुटमुळे. सायली संजीव अधून मधून वडिलांसोबतच्या आठवणी शेअर करत असते. मध्यंतरी सायलीनं बाबांच्या आठवणीत टॅटू गोंदवला होता. तसेच त्यांच्या नावाची एक अंगठी देखील तयार करून घेतली होती. आता तिच्या वडिलांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने सायलीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य; व्हिडीओ व्हायरल

या पोस्टमध्ये वडिलांसोबतचा फोटो शेअर करत सायलीने म्हटलंय कि, ''संजीव…राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय.. खूप झालं बास..नाही शक्य...आजही मला हवा आहेस तू. परत ये ना please...'असं म्हणत सायलीने 'बाबा या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. ती म्हणतेय, साद हि घालते लाडकी तुला..जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा...' आजच्या दिवशी सायली चांगलीच भावुक झालेली पाहायला मिळाली आहे.

सायलीनं आपल्या वडिलांच्या जाण्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. सायलीच्या वडिलांच्या निधन होऊन आज  एक वर्ष झालं आहे. आजही सायली आपल्या वडिलांना मिस करताना दिसते. वाढदिवस असेल किंवा आणि काय ती नेहमीच तिच्या वडिलांच्या आठवणी शेअर करत असते. शेवटी बाप लेकीचं नातचं काही वेगळं असतं. सायलीच्या प्रत्येक पोस्टमधून तिचं बाबावरचं प्रेम दिसत तसेच ती आजही तिच्या वडिलांनी किती मिस करते याचं देखील दर्शन होतं.

सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी ती हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Sayali Sanjeev