मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला मिळालीय खास दैवी देणगी! 'हास्यजत्रा' फेम समीर चौगुलेंनी उघड केलं गुपित

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला मिळालीय खास दैवी देणगी! 'हास्यजत्रा' फेम समीर चौगुलेंनी उघड केलं गुपित

विनोदवीर समीर चौगुलेंनी प्राजक्ताबाबत एक अशी गोष्ट सांगितली आहे. ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत.

विनोदवीर समीर चौगुलेंनी प्राजक्ताबाबत एक अशी गोष्ट सांगितली आहे. ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत.

विनोदवीर समीर चौगुलेंनी प्राजक्ताबाबत एक अशी गोष्ट सांगितली आहे. ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत.

  मुंबई, 8 ऑगस्ट-   'रानबाजार' या अतिशय बोल्ड आणि वास्तवाची जाणीव करुन देणाऱ्या मराठी वेबसीरीजमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रचंड चर्चेत आली होती. प्राजक्ताच्या अभिनयाचंदेखील भरभरून कौतुक झालं होतं. त्यांनतर आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान विनोदवीर समीर चौगुलेंनी प्राजक्ताबाबत एक अशी गोष्ट सांगितली आहे. ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. 'जुळून येती रेशीमगाठी' या झी मराठीवरील मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. शिवाय या मालिकेतील जोडीसुद्धा सुपरहिट ठरली होती. प्राजक्ता या मालिकेत अभिनेता ललित प्रभाकरसोबत झळकली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. आज अभिनेत्रीने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. आज ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी तिच्याबाबत एक खास पोस्ट लिहत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौगुले पोस्ट- Happy birthday to the real and pure friend Prajakta Real ... माझ्या "वा दादा वा"च्या जागतिक हक्कांची मालकीण...अत्यंत लाघवी आणि ever energetic मुलगी...दीड दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः १५ मिनिटात पाठ करून अत्यंत सहज सुलभ पद्धतीने सादर करणे ही तिला मिळालेली दैवी देणगी आहे. प्राजू you are very special to me..and you know that.....wish you a very happy birthday.....
  (हे वाचा:Man Kasturi Re: अभिनय बेर्डेसोबत रोमान्स करणार तेजस्वी प्रकाश; 'या'दिवशी रिलीज होणार अभिनेत्रीचा मराठी सिनेमा ) प्राजक्ता माळीने मालिकांनंतर आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. त्यांनतर अभिनेत्री आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा सक्रिय झाली आहे. तिची रानबाजार ही वेबसीरीज तुफान चर्चेत आली होती. यामध्ये तेजस्विनी पंडित, उर्मिला कोठारे, माधुरी पोवार या अभिनेत्रीसोबत अनेक प्रसिद्ध अभिनेतेसुद्धा होते. तसेच प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे तिचं समीर चौगुलेंसोबत फारच छान बॉन्डिंग आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या