मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Happy birthday Yash : बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश, आता कन्नड सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

Happy birthday Yash : बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश, आता कन्नड सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

Happy Birthday Yash: कन्नड चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आणि केजीएफ (KGF) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा आज 34 वा वाढदिवस आहे.

Happy Birthday Yash: कन्नड चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आणि केजीएफ (KGF) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा आज 34 वा वाढदिवस आहे.

Happy Birthday Yash: कन्नड चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आणि केजीएफ (KGF) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा आज 34 वा वाढदिवस आहे.

मुंबई, 08 जानेवारी: कन्नड चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आणि केजीएफ (KGF) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा आज 34 वा वाढदिवस आहे. रॉकिंग स्टार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या यशबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत. खरं तर कुणी कुठं जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नाही पण परिस्थितीवर रडत न बसता आपल्या कर्तृत्वावर उत्तुंग उंची गाठणाऱ्यांमध्ये यशचं नाव घेतलं जातंय. यश मूळचा कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील एका छोट्या गावातला. त्याचं नाव नवीन कुमार गौडा. त्याचे वडील अरुण कुमार जे. कर्नाटक एसटी सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि आई पुप्पलता गृहिणी आहे. म्हैसूरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर यश बेंगळुरूला गेला आणि तिथं बी. व्ही. कारंथांनी स्थापन केलेल्या बेनाका या नाटक करणाऱ्या ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली. एका मुलाखतीत यश म्हणाला, ‘माझे वडील आजही बस ड्रायव्हर म्हणून काम करतात त्यामुळेच माझे पाय जमिनीवर राहतात.’

राजमौली म्हणतात-यशचे वडिलच खरे हिरो

केजीएफ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक एस. एस. राजमौली म्हणाले, ‘यश हा एका बस ड्रायव्हरचा मुलगा आहे हे ऐकल्यावर मी चकितच झालो आणि त्याचे वडिल अजूनही नोकरी करतात हे कळल्यावर तर मी थक्कच झालो माझ्या दृष्टिने यशपेक्षा त्याचे वडिलच खरे हिरो आहेत.’

टीव्हीवरच्या भूमिकांतून सुरुवात, तिथेच भेटली राधिका

यशने गाठलेलं यशाचं उत्तुंग शिखर एका दिवसाचं फलित नाही. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी नंद गोकुळ नावाच्या टीव्ही मालिकेत यशने काम केलं. सुरुवातील यशने टीव्ही मालिकांत सहायक कलाकार म्हणून काम केलं. 2007 मध्ये जांबाडा हुडुगी या कन्नड चित्रपटात यशने केलेल्या छोट्याशा भूमिकेमुळे त्याला चित्रपटांत ब्रेक मिळाला. तिथंच त्याला जन्माची जोडीदार राधिका पंडित भेटली आणि त्यांनी नंतर लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. यश आणि राधिकाने स्थापन केलेल्या यशो मार्ग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तलावांची पुनर्बांधणी केली आहे.

कन्नड सिनेसृष्टीमधला सर्वांत महागडा कलाकार

एका दशकाच्या काळात यशने जोरदार प्रगती केली असून तो सध्या कन्नड भाषेतला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. कन्नड चित्रसृष्टीतला सर्वांत महागडा चित्रपट केजीएफच्या अद्वितीय यशानंतर सध्या तो एका प्रोजेक्टसाठी 15 कोटी रुपये घेतो. देशभर यश मिळवणारा केजीएफ हा चित्रपट कन्नड भाषेतील 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून या वर्षी प्रदर्शित होणारा केजीएफ 2 त्याहून यशस्वी ठरेल आणि कन्नडमधील 500 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

First published:

Tags: मनोरंजन