मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुपरहिट चित्रपटासाठी चाहते करतात दुधानं अभिषेक; पाहा दानशूर विक्रमचा थक्क करणारा प्रवास

सुपरहिट चित्रपटासाठी चाहते करतात दुधानं अभिषेक; पाहा दानशूर विक्रमचा थक्क करणारा प्रवास

व्हाययचं होतं संगीतकार... झाला सुपरस्टार हिरो; पाहा बिग बींसाठी गाणं गाण्याची स्वप्न पाहणाऱ्या विक्रमचा थक्क करणारा प्रवास

व्हाययचं होतं संगीतकार... झाला सुपरस्टार हिरो; पाहा बिग बींसाठी गाणं गाण्याची स्वप्न पाहणाऱ्या विक्रमचा थक्क करणारा प्रवास

व्हाययचं होतं संगीतकार... झाला सुपरस्टार हिरो; पाहा बिग बींसाठी गाणं गाण्याची स्वप्न पाहणाऱ्या विक्रमचा थक्क करणारा प्रवास

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 17 एप्रिल: विक्रम (Vikram) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. त्यानं आजवर रोमान्स, अक्शन, थ्रिलर, विनोदी अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम आहे. त्यामुळंच अनेकदा त्याची तुलना हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ड डिनेरो यांच्याशी देखील केली जाते. लक्षवेधी बाब म्हणजे विक्रमचा चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी चाहते मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवांना दुधान अभिषेक घालतात. यावरुन विक्रमच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. विक्रमचा आज वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अन् त्यानं देखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. खरं तर विक्रमनं एक संगीतकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तो अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे. अन् एक दिवस त्यांच्यासाठी गाणं तयार करण्याची संधी मिळावी यासाठी त्यानं बॉलिवूडच्या आपलं मार्गक्रमण सुरु केलं. परंतु तो त्यामध्ये अपयशी ठरला. अनेक बॉलिवूड निर्मात्यांनी त्याच्या गाण्यांना रिजेक्ट केलं. शिवाय काहींनी तर त्याची आर्थिक फसवणूक देखील केली. अन् ज्यांनी गाणी घेतली त्यांनी कामाचं क्रेडिट दिलं नाही. त्यामुळं अपेक्षित संधी मिळत नसल्यामुळं त्यानं दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या दिशेने आपलं लक्ष वळवलं. अवश्य पाहा - त्या गोष्टीमुळं होणार होतं ब्रेकअप; ‘गंती बात’ फेम माहिमानं सांगितलं बेडरुम सिक्रेट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्याला संगीतकार म्हणून नव्हे तर अभिनेता म्हणून काम मिळालं. 1990 साली एन कांधल कमन्नी या चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्यानं मीरा, कावल गितम, शिनाय, स्ट्रिट यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं. विक्रमला खरी लोकप्रियता मिळाली ती माफिया या चित्रपटामुळं. या चित्रपटानं त्यावेळी सात कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटामुळं विक्रमला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या पंक्तित स्थान मिळालं. अन् ते स्थान आजतागात कायम आहे. अपरिचित, आय, इंटरनॅशनल राऊडी या चित्रपटांमुळं तो बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाला. अवश्य पाहा - त्या चुकीसाठी रितेश देशमुखला खाव्या लागतात चपला; व्हिडीओद्वारे सांगितली व्यथा अभिनयासोबत विक्रम समाजसेवेच्या कामातही पुढाकार घेतो. त्यानं एका स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत मिळते. त्यानं अनेक मजुरांना काम मिळवून दिली आहे. तामिळनाडूमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा त्यानं अनेकांची राहण्याची व्यवस्था आपल्या राहत्या घरात केली होती. कुठलाही बॉडिगार्ड न घेता तो थेट आपल्या चाहत्यांना जाऊन भेटतो. शिवाय प्रत्येक चित्रपटात मिळालेल्या मानधनापैकी काही रक्कम तो गरीबांना दान करतो. या दानशूर प्रवृत्तीमुळं विक्रम सर्वसामान्य लोकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. अन् त्यामुळंच त्याचा चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी चाहतेच इश्वराकडे प्रार्थना करताना दिसतात.
First published:

Tags: Actor, Comedy actor, Entertainment

पुढील बातम्या