Home /News /entertainment /

‘त्या’ घटनेनंतर विद्या बालन होती निराशेच्या गर्तेत; 8 महिने आरशात चेहराही बघितला नव्हता

‘त्या’ घटनेनंतर विद्या बालन होती निराशेच्या गर्तेत; 8 महिने आरशात चेहराही बघितला नव्हता

विद्या बालनचा (Vidya Balan) आज वाढदिवस आहे. ज्या काळात हिरोईनचा वापर फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणून चित्रपटात होत असे त्या काळात विद्याने अभिनेत्रीच्या नावावर चालणारे चित्रपटांचा ट्रेंड आणला. तिच्या नावावर चित्रपट चालायला लागले.

  मुंबई, 01 जानेवारी : बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकेकाळी हिरोच्या नावावर चित्रपट चालायचे आणि अभिनेत्री फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणून नावाला असायच्या ही परिस्थिती बदलण्यात एका अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा आहे आणि ते नाव म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). अभिनेत्री विद्या बालनचा आज 41 वा वाढदिवस. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबईतच झाला. तिचं सगळं बालपणदेखील मुंबईत गेलं. तारुग्ण्यात प्रवेश करतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजच्या जीवनातच तिने कामाला सुरुवात केली. विद्या बालनच्या नावावर आज अनेक हिट चित्रपट आहेत पण एकेकाळी तिला प्रचंड निराशेचा सामना करावा लागला होता. त्याचं कारणही तसंच होतं. करिअरच्या सुरुवातीला तिची छबी अतिशय नकारात्मक बनली होती. तिच्या फॅशन सेन्सवरुनही तिला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या जायच्या.
  View this post on Instagram

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  एका मुलाखतीमध्ये विद्या बालनने एक अनुभव सांगितला होता ती म्हणाली होती की, ‘करिअरच्या सुरुवातीला मी एका चित्रपटाच्या ऑडिशनला गेले होते तिथे माझं सिलेक्शनही झालं होतं. त्यानंतर त्या मल्याळम सिनेमातून मला एकाएकी काढून टाकण्यात आलं. सिनेमातून का काढलं असं विचारायला माझे आईवडील निर्मात्याला भेटायला गेले होते. तर तो निर्माता माझ्याच आई वडिलांवर ओरडून म्हणाला, हिचा चेहरा बघा ही हिरोईन दिसते तरी का? ही गोष्ट मला समजल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला होता. मी एवढी निराश झाले की जवळजवळ 8 महिने माझा चेहरा आरशात बघितलाही नाही.’
  View this post on Instagram

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  पुढे प्रचंड स्ट्रगल करुन विद्याने बॉलिवूडमध्ये स्वत: खास जागा निर्माण केली. इतर अभिनेत्री जेव्हा झिरो फिगरच्या मागे होत्या तेव्हा तिने आपल्या वजनदार व्यक्तीमत्वाने आणि उत्तम अभिनयानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मिशन मंगल, भूलभुलय्या, कहानी, द दर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसिका असे सुपरहिट चित्रपट दिले.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress, Vidya Balan

  पुढील बातम्या