Home /News /entertainment /

HBD: 'टारझन' बॉय वत्सल शेठचा बॉलिवूडला रामराम? आता या ठिकाणी रमलाय अभिनेता

HBD: 'टारझन' बॉय वत्सल शेठचा बॉलिवूडला रामराम? आता या ठिकाणी रमलाय अभिनेता

‘टारझन : द वंडर कार’ या चित्रपटातून वत्सलला मोठी ओळख मिळाली होती. मात्र त्यानंतर त्याने जास्त बॉलिवूड चित्रपटांत काम केलं नाही.

  मुंबई 5 ऑगस्ट : ‘टारझन : द वंडर कार’ (Tarzaan : The Wonder Car) हा चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यातील राज आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यातील राज म्हणजेच अभिनेता वत्सल शेठ (Vatsal Sheth). वत्सलने त्यानंतर जास्त कोणत्या चित्रपटांत काम केलं नाही. तर मुख्य भूमिकेत तो झळकला नाही. वत्सलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तो सध्या काय करतोय. वत्सलचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म 5 ऑगस्ट 1980ला एका गुजराती कुटुंबात झाला होता. वत्सलच संपूर्ण बालपण आणि शिक्षण हे मुंबईतच झालं होतं. वत्सलला अभिनयात रस होता. 1996 साली त्याने ‘जस्ट मोहब्बत’ (Just Mohabbat) या हिंदी मालिकेतून आपल्या करिअरला केली होती. 2004 पर्यंत तो याच मालिकेत काम करत होता.

  बापरे! कमाईच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्सनाही मागे टाकतात हे साउथ स्टार्स; आकडे ऐकूनच चक्रावून जाल

  View this post on Instagram

  A post shared by Vatsal Sheth (@vatsalsheth)

  त्यानंतर त्याला सुपरहिट ‘टारझन : द वंडर कार’ या चित्रपटात काम मिळालं. तर तो हीट देखील ठरला. यानंतर वत्सलला बॉलिवूडमध्ये चांगलं करिअर आहे असा म्हटलं जात होतं, मात्र पुन्हा तो जास्त चित्रपटांत दिसला नाही. काही चित्रपट त्याने केले मात्र ते हीट ठरले नाहीत. त्यानंतर वत्सल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतला. त्याच्या मालिका मात्र हीट ठरल्या.
  View this post on Instagram

  A post shared by Vatsal Sheth (@vatsalsheth)

  ‘एक हसीना थी’ या 2014 साली आलेल्या मालिकेतून तो पुन्हा एकदा हीट ठरला. अभिनेत्री संजीदा शेख सोबत तो झळकला होता. यानंतर तो 2016 साली ‘रिश्तों का सौदागर बाजीगर’  या मालिकेत दिसला. या तो तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्तासोबत (Ishita Dutta) दिसला. यावेळी त्यांची खास मैत्री झाली. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 साली त्यांनी गुपचूप लग्नं केलं होतं. तर त्यानंतर ही बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Tv actor

  पुढील बातम्या