Home /News /entertainment /

Happy Birthday Urvashi Rautela:मनीष मल्होत्राच्या पार्टीत आमंत्रणाशिवाय पोहोचली होती उर्वशी रौतेला, झाला होता मोठा अपमान

Happy Birthday Urvashi Rautela:मनीष मल्होत्राच्या पार्टीत आमंत्रणाशिवाय पोहोचली होती उर्वशी रौतेला, झाला होता मोठा अपमान

Happy Birthday Urvashi Rautela: अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.

    मुंबई, 25 फेब्रुवारी-   बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela)  नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते. ही अभिनेत्री सतत आपल्या लुक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. अगदी कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आज आपला 28 वा वाढदिवस साजरा  (Urvashi's Birthday Today)  करत आहे. अभिनेत्री अनेकवेळा वादातसुद्धा सापडली आहे. पाहूया यामध्ये कोणकोणत्या वादग्रस्त गोष्टींचा समावेश आहे. उर्वशी रौतेला सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. ती सतत मोठमोठ्या कलाकरांसोबत हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये दिसून येते. आज तिच्यासाठी ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. परंतु एक वेळ अशी होती. की अभिनेत्रीला अपमानित व्हावं लागलं होतं. असं म्हटलं जातं की, उर्वशी रौतेला एकदा मनीष मल्होत्राच्या हायप्रोफाइल पार्टीत आमंत्रणाशिवाय पोहोचली होती. या पार्टीसाठी तिला आमंत्रित करण्यात आले नव्हते. परंतु यावेळी तिने पार्टीत जाऊन अनेक बड्या स्टार्ससोबत फोटो क्लिक केले होते. उर्वशी रौतेला अशा प्रकारे कोणत्याही आमंत्रणाशिवाय पोहोचल्याने प्रचंड चर्चेत आली होती. उर्वशी रौतेलाला 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपट ऑफर करण्यात आला होता. इंदर कुमार यांनी जेव्हा उर्वशीला 'ग्रेट ग्रँड मस्ती' मधील तिची भूमिका ऑफर केली तेव्हा तिला तिची भूमिका तितकीशी योग्य वाटली नाही. आणि म्हणून उर्वशी रौतेलाने चित्रपट निर्मात्यांना सुमारे तीन महिने प्रतीक्षा करायला भाग पाडलं होतं. त्यानंतर तिने चित्रपटला होकार दिला होता. उर्वशी रौतेला या कारणामुळेसुद्धा खूप चर्चेत होती. (हे वाचा:Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू चिंतेत) उर्वशी रौतेला 2012 मध्ये तेव्हा प्रसिद्धी झोतात आली जेव्हा तिला मिस इंडिया युनिव्हर्सचा मुकुट परत करण्यास सांगितले गेले. आयोजकांना त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की उर्वशी रौतेला ही सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी खूपच लहान आहे. परंतु या काळात उर्वशी रौतेलाने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Urvashi rautela

    पुढील बातम्या