Happy B'day Shankar Mahadevan: संगीताची कट्यार प्रेक्षकांच्या काळजात घुसवणारा अवलिया

Happy B'day Shankar Mahadevan: संगीताची कट्यार प्रेक्षकांच्या काळजात घुसवणारा अवलिया

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या आवाजाच्या जादूनं मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायाकाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया... (Happy Birthday Shankar Mahadevan)

  • Share this:

मुंबई 3 मार्च: शंकर महादेवन (Shankar Mahadevan) हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक नामांकित गायक म्हणून ओळखले जातात. आपल्या सुरेल आवाजनं तब्बल दोन दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शंकर महादेवन यांचा आज वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या आवाजाच्या जादूनं मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायाकाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया... (Happy Birthday Shankar Mahadevan)

मराठी चित्रपटात काम करणं हे त्याचं स्वप्न होतं...

हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. तसंच मराठी चित्रपटात (Marathi Film) त्यांनी आपल्या अभिनयाचे गुणही दाखवले आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठीतील ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात शंकर यांनी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांनी साकारलेली पंडित भानु शास्री ही भूमिका आजही मराठी रसिकांच्या आठवणींत आहे. विशेष म्हणजे शंकर यांना मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी आधी अभिनय केला नव्हता. त्यामुळे त्यांना वाटलं की ऑफर देणारे गंमत म्हणून विचारत आहेत. पण प्रत्यक्षात भूमिका स्वीकारल्यावर शंकर यांनी ती उत्कृष्ट वठवली.  एक उत्कृष्ट पार्श्वगायक आणि म्युझिक कंपोजर म्हणून ओळख असणाऱ्या शंकर यांना आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार (National Award) देऊन गौरवण्यात आलं आहे.

अवश्य पाहा - वाढदिवसानिमित्त श्रद्धानं मागितलं खास गिफ्ट; ऐकूनच शक्ती कपूर यांना फुटला घाम

शंकर महादेवन यांचा थक्क करणारा प्रवास...

शंकर यांचा जन्म 3 मार्च 1967 ला मुंबईतील एका तमिळ कुटुंबात झाला. लहानपणीच त्यांनी शास्रीय आणि कर्नाटक संगीताचं शिक्षण घेतलं. मराठीतील दिग्गज संगीतकार दिवंगत श्रीनिवास खळे यांच्याकडूनही ते गाणं शिकले. शंकर यांनी 5 व्या वर्षीच वीणा वादनाला सुरुवात केली.  शंकर, एहसान, लॉय या त्रयींनी एकत्रितपणे अनेक हिट म्युझिक अल्बम तयार केले आणि ते प्रचंड गाजले. शंकर महादेवन यांनी ब्रेथलेस नावाचं गाणं गायलं होतं त्यात त्यांनी 3 मिनिटांचं गाणं एका श्वासात गायलं होतं त्यामुळे त्याची प्रचंड चर्चा झाली. या गाण्यामुळेच शंकर महादेवन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करता आली. त्यांचं हे गाणं ऐकून लोक थक्क झाले होते आणि या ब्रेथलेस गाण्यामुळेच शंकर एका रात्रीत सुपरस्टार झाले होते.

शंकर यांनी 1998 मध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं. त्यांना मराठी, तमिळ, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या भाषा येतात. शंकर यांचा मुलगा सिद्धार्थ हा पण गायकच आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील जिंदा हे गाणं गाऊन सिद्धार्थने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: March 3, 2021, 10:24 AM IST

ताज्या बातम्या