Home /News /entertainment /

Shubhangi Atre B'day: 'आठवड्यातून फक्त एक वेळा मुलीला भेटायला....' अंगुरी भाभीने खाजगी आयुष्याबाबत केला होता मोठा खुलासा

Shubhangi Atre B'day: 'आठवड्यातून फक्त एक वेळा मुलीला भेटायला....' अंगुरी भाभीने खाजगी आयुष्याबाबत केला होता मोठा खुलासा

'भाभीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai) या लोकप्रिय कॉमेडी मालिकेमधून अंगूरी भाभी (Anguri Bhabhi) म्हणजेच शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) घराघरात पोहोचली आहे. आज अभिनेत्री आपला वाढिदवस साजरा (Shubhangi Atre Birthday) करत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 एप्रिल- 'भाभीजी घर पर हैं'  (Bhabhiji Ghar Par Hai)  या लोकप्रिय कॉमेडी मालिकेमधून अंगूरी भाभी (Anguri Bhabhi)  म्हणजेच शुभांगी अत्रे   (Shubhangi Atre)  घराघरात पोहोचली आहे. शुभांगीला 'भाभीजी घर पर हैं' मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. परंतु या अभिनेत्रीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'कस्तुरी', 'कसौटी जिंदगी की', 'दो हंसों का जोडा' आणि 'चिडियाघर' यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. तिच्या सहज-सुंदर अभिनयामुळे तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि दाद मिळत आहे. आज अभिनेत्री आपला वाढिदवस साजरा   (Shubhangi Atre Birthday)  करत आहे. यानिमित्ताने तिच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया. शुभांगी अत्रेचा जन्म 11 एप्रिल 1981मध्ये मध्य प्रदेश येथील पचमढी या शहरात झाला आहे. अभिनेत्रीचे सुरुवातीचे शिक्षणही पचमढी येथे झाले आहे. शालेय शिक्षण घेतल्यानंतर, शुभांगीने इंदूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने एमबीएची पदवीही घेतली आहे.मालिकेत साधीभोळी दिसणारी 'अंगुरी'आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र फारच हुशार आणि उच्चशिक्षित आहे. शुभांगीने मालिका आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीची सर्वांनाच ओळख आहे. परंतु तिच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. शुभांगी एका गोंडस लेकीची मुलीची आई आहे. तिने 2007 मध्ये बिझनेसमन पीयूष पुरीसोबत लग्न केले आहे. शुभांगीचं सासर मध्य प्रदेशात आहे. परंतु ती तिच्या पती आणि मुलीसह मुंबईत एका आलिशान घरात राहते. शुभांगीला नेहमीच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. खूप प्रयत्नानंतर 2007 मध्ये तिला टीव्हीवर काम करण्याची संधी मिळाली होती. शुभांगीने एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या शोनंतर शुभांगीने 'कस्तुरी', 'हवन', 'चिडियाघर' आणि 'दो हंसों का जोडा' सारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, शुभांगीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. शुभांगी पुण्याहून मुंबईत आली तेव्हा तिची मुलगी केवळ 11 महिन्यांची होती. तिच्या कारकिर्दीतील सुरुवातीचे दिवस आठवत ती सांगते, “मी पुण्यात राहायचे. मी नेहमीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत होते. पण ते कसं सत्यात उतरवावं हे मला माहित नव्हतं. त्यानंतर मी पुण्यात मॉडेलिंग असाइनमेंट केले. त्यानंतर मला एका ऑडिशनबद्दल माहिती मिळाली. त्यांनतर माझा पहिला शो 'कसौटी जिंदगी की' २००७ मध्ये आला."शुभांगी पुढे सांगते, “जेव्हा मी माझा पहिला शो करत होते, तेव्हा मी प्रत्येक आठवड्याला माझ्या मुलीला भेटायला पुण्याला जात असे. लवकरच, माझे पती आणि माझी मुलगी मुंबईला शिफ्ट झाले त्यांनतर सर्व गोष्टी बऱ्याच सोप्या झाल्या'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या