मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास

HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास

एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. आज सुनील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. आज सुनील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. आज सुनील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

  • Published by:  News Digital

मुंबई 11 ऑगस्ट : बॉलिवूडचा अँक्शन हिरो अशी अभिनेता सुनील शेट्टींची (Suneil Shetty) ओळख आहे. अनेक हिट चित्रपट दिलेल्या सुनील शेट्टींना आजही लोक त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी ओळखतात. एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. आज सुनील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

सुनील शेट्टींचा जन्म 11 ऑगस्ट 1961 साली मंगरुळूत झाला होता. अभिनयात रुची नसलेल्या सुनील यांनी नंतर याच क्षेत्रात मोठं नाव कमावलं. त्यांनी काही मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना अभिनय नाही क्रिकेट खेळायचं होतं पण चित्रपटांतच जास्त यश मिळू लागलं. 1992 साली आलेला चित्रपट 'बलवान'मधून (Balwan) त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

त्यानंतर सुनील यांनी 'दिलवाले', 'मोहरा', 'गोपी किशन', 'टक्कर', 'कृष्णा', 'सपूत', 'बॉर्डर', 'भाई', 'आक्रोश' अशा सुपरहिट चित्रपटांत काम केलं. केवळ अँक्शन चित्रपटच नाही तर कॉमेडी, रोमॅन्टीक आणि विलन अशा चित्रपटांतही कामं केली आहेत. ज्यात हेराफेरी, धडकन या चित्रपटांचा समावेश होतो. 'रुद्राक्ष' , 'मैं हूं न' या चित्रपटांत त्यांनी खलनायकाची भूमिके देखील साकारली आहे.

हे बॉलिवूड सेलिब्रिटी होते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये; Breakup करत केलं दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न

एक अभिनेता म्हणूनच नाही तर तर एक उत्तम उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. चित्रपटांपेक्षाही अधिक पैसे ते आपल्या बिझनेसमधून कमावतात. सुनील शेट्टींची अनेक रेस्टॉरंट्स (Restaurants) आणि क्लब्स (Clubs) आहेत. याशिवाय एका अँडव्हेंचर पार्कचे (Adventure park) ते मालकही आहेत. फक्त रेस्टॉरंट्सच नाही तर फर्निचर, होम डेकॉर या क्षेत्रातही त्यांचा मोठा व्यवसाय आहे. याशिवाय रियल इस्टेटमध्येही त्यांचा बिझनेस आहे. त्यात ते सर्वाधिक पैसे कमावतात असं सांगण्यात येतं. त्यामुळे सध्या त्यांनी पूर्ण लक्ष हे आपल्या बिझनेसवर दिलं आहे. काही काळ ते चित्रपट निर्मातेही होते, पण त्यात त्यांना फार यश मिळालं नव्हतं.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Sunil shetty