मुंबई, 19 मे : 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरीजनंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं सध्या स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आज त्याचा 45वा वाढदिवस. नाजुद्दीनचा जन्म मुज्जफ्फरनगरच्या बुढाना या छोट्याश्या गावात 1974मध्ये झाला. पण बुढाना ते बॉलिवूड हा नवाजुद्दीनचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याला अनेकदा त्याच्या लुक आणि त्वचेच्या रंगावरून हिणवण्यात आलं होतं. याच कारणामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळवतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण त्याला फक्त बॉलिवूडमध्ये या परिस्थितीचा सामना करावा लागला असं नाही तर त्याच्या नातेवाईकांनीही त्याला अशाच प्रकारे हिणवलं होतं. याचा खुलासा स्वतः नवाजुद्दीन सिद्दिकीनं एका मुलाखतीत केला.
निलेश मिश्राच्या गाँव कनेक्शन या शोमध्ये नवाजुद्दीन गावातून मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं यावर गप्पा मारल्या. यावेळी तो म्हाणाला, जेव्हा लोक गावातून मुंबईमध्ये येतात तेव्हा त्यांना वाटतं की मुंबईमध्ये काम मिळेल. जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझ्यासोबतही असंच काहीसं झालं मवा अनेक ठोकरी खाव्या लागल्या माझ्या व्यक्तिमत्त्वावरुन अनेकदा लोकांनी मला हिणवलं. अनेकदा माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, 'मी एखाद्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जायचो आणि त्याच्या असिस्टंटच्या समोर उभा रहिलो की आधी तो मला वरुन खालीपर्यंत न्याहाळायचा आणि मग विचारायचा, काय काम आहे. जेव्हा मी सांगायचो की मी अभिनेता आहे. तेव्हा ते बोलायचे चेहऱ्यावरुन तर अभिनेता वाटत नाही. मग तो मला अभिनय करुन दाखवायला सांगायचा. अनेकदा ते काही स्पीच द्यायला सांगायचे. मी त्यांना सांगयचो मी तर तयारी करुन आलो आहे बाकी तुम्ही पाहा. एवढ सर्व झाल्यावर उत्तर मात्र नकारात्मक यायचं. असं अनेक दिवस झालं. मी अनेकदा फेअर अँड लव्हली क्रिमही आणून चेहऱ्याला लावली. पण त्याने काही फरक पडला नाही'
या मुलाखतीत नवाजुद्दीननं त्यांच्या कुटुंबाची कथाही सांगितली, तो म्हणतो, माझ्या कुटुंबात सर्वच लोक 6-6 फुट उंचीचे आणि गोरे आहेत. फक्त माझे आई-वडील सावळे आणि कमी उंचीचे आहेत त्यामुळे मी पण त्यांच्यासारखाच झालो. पण माझ्या नातेवाईकांनीही आम्हाला तशीच वागणूक दिली. त्यांनी कधीच आम्हाला आपलं मानलं नाही. या खेळाची सुरुवात तिथूनच झाली होती आणि यामुळे मला खूप वाईटही वाटायचं. माझ्या मनात कमीपणाची भावना येत असे.
नवाजुद्दीन सिद्दीची प्रमुख भूमिका असलेली वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या वेबसीरिजमधील नवाजुद्दीननं साकारलेली गणेश गायतोंडे ही खलनायकी भूमिका खूप गाजली. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा प्रोमो रिलीज झाला असून त्यामुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?
'SOTY 2'वरून कंगनाची बहीण रंगोलीनं करण जोहरवर साधला निशाणा