मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Birthday Special: भविष्यवाणी ठरली खरी; या शोमुळं बदललं श्रेया घोषालचं आयुष्य

Birthday Special: भविष्यवाणी ठरली खरी; या शोमुळं बदललं श्रेया घोषालचं आयुष्य

आज संगीत क्षेत्रात येणारे अनेक नवे कलाकार श्रेयाला आपला आदर्श मानतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या श्रेयाचं आयुष्य एका स्टेज शोमुळं बदललं होतं.

    मुंबई 12 मार्च: श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका आहे. तिनं आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून तब्बल एक दशक रसिकांच्या मनावर राज्य केलं. आज संगीत क्षेत्रात येणारे अनेक नवे कलाकार श्रेयाला आपला आदर्श मानतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या श्रेयाचं आयुष्य एका स्टेज शोमुळं बदललं होतं. या शोमुळं अचानकच ती प्रकाशझोतात आली. अन् भविष्यात ती लोकप्रिय गायिका होणार असे कयास नामांकित गायक व्यक्त करु लागले. (Shreya Ghoshal first stage show) श्रेयाची आई एक शास्त्रिय गायिका आहे. त्यामुळं लहापणापासूनच तिच्या घरात संगीताचं वातावरण होतं. 3 वर्षांची असताना तिनं गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आईच तिची पहिली गुरु होती. वयाच्या सहाव्या वर्षी तिनं सारेगामापा (music reality show Sa Re Ga Ma) या संगीत शोमध्ये भाग घेतला होता. 2000 साली या चाईल्ड स्पेशल शोच्या ऑडिशनमध्ये तिनं पहिल्यांदा स्टेजवर गाणं गायलं होतं. त्यावेळी तिनं गायलेलं गाणं ऐकून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. या शोचं सुत्रसंचालन सोनू निगम करत होता. त्यानं देखील श्रेयाच्या आवाजाची प्रचंड स्तुती केली. ही स्तुती ऐकून श्रेयानं गाण्यामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं अनेक मोठ मोठ्या स्पर्धामध्ये भाग घेतला. तिच्या गायन कौशल्याची सर्वत्र स्तुती होऊ लागली. अन् 2002 साली संजय लीला भंसाळी यांच्या देवदास या चित्रपटातील गाणी गाऊन तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अवश्य पाहा - पत्नी आएशानं एक्स गर्लफ्रेंडला लिहिलं पत्र; जॅकी श्रॉफने सांगितला तो किस्सा श्रेयानं आपलं पहिलं प्लेबॅक गाणं गायलं तेव्हा ती केवळ 16 वर्षांची होती. या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित केलं गेलं. यानंतर तिनं मागे वळून पाहिलंच नाही. तब्बल 150 पेक्षा अधिक गाणी गाऊन तिनं रसिकांच्या मनावर राज्य केलं. सध्या ती बॉलिवूडपासून काही दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिनं आपण लवकरच आई होणार आहोत अशी घोषणा केली होती.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Birthday celebration, Entertainment, Marathi entertainment, Singer

    पुढील बातम्या