मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD Sara Ali Khan: म्हणून सारा वडील सैफ आणि करीनापासून राहते दूर; सांगितलं हे कारण

HBD Sara Ali Khan: म्हणून सारा वडील सैफ आणि करीनापासून राहते दूर; सांगितलं हे कारण

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amruta Singh) यांची मुलगी सारा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच हीट ठरत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिनेत्री विषयी खास गोष्टी.

  • Published by:  News Digital

मुंबई 12 ऑगस्ट : सध्याची बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत राहणारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) आज वाढदिवस. 12 ऑगस्ट 1995ला मुंबईत साराचा जन्म झाला होता. पतौडी घराण्याची लाडकी नात अशीही तिची ओळख आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amruta Singh) यांची मुलगी सारा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच हीट ठरत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिनेत्री विषयी खास गोष्टी.

साराने 2018 साली केदारनाथ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘सिम्बा’ या चित्रपटात काम केलं. चित्रपटांशिवाय अनेक मोठ्या ब्रँड्सची अम्बेसेडर आहे. साराच्या प्रोफेशनल लाईफ इतकचं तिचं वैयक्तिक जीवनही चर्चेत राहतं. सैफ आणि अमृताने 2004 साली घटस्फोट घेतला होता. (Sara Ali Khan birthday)

सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला असला तरी सारा आणि सैफच एकमेकांशी फार घट्ट नातं आहे. अनेकदा ते एकत्र दिसतात. तसेच सारा देखील सैफ आणि करीनाच्या मुलांसोबत खेळताना दिसते. मात्र सारा आपल्या वडिलांच्या कुटुंबासोबत राहत नाही. तर आपली आई आणि भाऊ इब्राहिम यांच्यासोबत राहते. तर आपल्या आई बाबांच्या घटस्फोटावरही तिने मत मांडल होतं.

यावर साराने एका मुलाखतीत सांगितल होत की, “हे खूप सोपं आहे. जेव्हा तुम्हाला दिसत की तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एकतर त्याच कुटुंबात रहा जिथे कोणीच आनंदी नाही किंवा वेगळे राहा, जिथे सगळे आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. आणि तुम्हाला देखील प्रत्येक वेळी भेटलं की वेगळी ऊर्जा आणि प्रेम मिळतं.”

VIDEO: OMG! उर्वशीचे कानातले पाहून भरेल धडकी; अभिनेत्रीची आगळी वेगळी फॅशन पाहून चाहतेही थक्क

पुढे ती म्हणाली, “मला वडील देखील आहेत, जे कधीही माझ्यासाठी फोनवर उपलब्ध असतात. आणि मी त्यांना कधीही कुठेही हवं तेव्हा भेटू शकते.” सैफ अमृताच्या घटस्फोटावर ती म्हणाली, “मला नाही वाटत ते एकत्र आनंदी होते, त्यामुळे वेगळं होणं हेच त्यावेळी चांगलं होतं.”

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Saif Ali Khan, Sara ali khan