• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: 'कुछ कुछ होता है' फेम अंजली आज झालीय फारच बोल्ड; शाहरुखची ऑनस्क्रीन मुलगी म्हणून आहे ओळख

HBD: 'कुछ कुछ होता है' फेम अंजली आज झालीय फारच बोल्ड; शाहरुखची ऑनस्क्रीन मुलगी म्हणून आहे ओळख

'कुछ कुछ होता है'(Kuch Kuch Hota Hai) हा चित्रपट अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील छोटी अंजली(Anjali) हि सर्वांची लाडकी आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- 'कुछ कुछ होता है'(Kuch Kuch Hota Hai) हा चित्रपट अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील छोटी अंजली(Anjali) हि सर्वांची लाडकी आहे. चित्रपटातील या लहान अंजलीची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.अंजलीची  भूमिका साकारणारी ही बालकलाकार म्हणजेच अभिनेत्री सना सईद(Sana Saeed) आज ३२ वर्षांची झाली आहे. आज ही अभिनेत्री आपला वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

  १९९८ मध्ये 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आपल्या भेटीला आला होता. या चित्रटामध्ये अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या प्रेमाचं त्रिकुट दिसून आलं होतं. मैत्री आणि प्रेम या पार्शवभूमीवर आधारित हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटातील गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. तसेच हा चित्रपट आजही अनेकांचा आवडता चित्रपट आहे. शाहरुख, काजोल आणि राणीशिवाय या चित्रपटात अजूनही एक गोष्ट  खास होती. आणि ती म्हणजे या चित्रपटातील बालकलाकार सना सईद होय. ( हे वाचा:HBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम) सना सईदने या चित्रपटात 'अंजली'ची भूमिका साकारली होती. जी शाहरुख खान आणि राणी मुखर्जीची मुलगी असते. या चित्रपटातील छोट्याशा अंजलीचा अभिनय सर्वांच्याच मनात घर करून गेला होता. आजही तिची भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. आणि आजही सनाला शाहरुख खानची ऑन स्क्रीन मुलगी म्हणून ओळखलं जात. सना आज तब्बल ३२  वर्षांची झाली आहे. सनाने २०१२ मध्ये सनाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून एक अभिनेत्री म्हणून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. चित्रपटात आलिया भट्ट, वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. ( हे वाचा:HBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..) ती गोड अंजली अर्थातच सना आज खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून ती चर्चेत असते. तसेच ती खूपच फिटनेस फ्रिक आहे. सतत आपले फिटनेस व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फिटनेसचदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतं. सना अलीकडेच 'नच बलिये', खतरों के खिलाडी' अशा रिएलिटी शोमध्येसुद्धा झळकली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: