Home /News /entertainment /

Rashmika Mandanna Birthday: कोण आहे या National Crush चा क्रश? तिचा 'ड्रीम हिरो' आहे दोन मुलांचा पिता

Rashmika Mandanna Birthday: कोण आहे या National Crush चा क्रश? तिचा 'ड्रीम हिरो' आहे दोन मुलांचा पिता

Happy Birthday Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदाना आज 05 एप्रिल रोजी तिचा 26वा वाढदिवस साजरा करते आहे. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून संबोधलं (National Crush Rashmika Mandanna) म्हणून संबोधलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिकाचा क्रश कोण आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 05 एप्रिल: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna Birthday) आज 05 एप्रिल रोजी तिचा 26वा वाढदिवस साजरा (Happy Birthday Rashmika Mandanna) करते आहे. अभिनेत्रीने एवढ्या कमी वयात मोठमोठी शिखरं गाठली आहे. 'पुष्पा- द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमातील 'श्रीवल्ली'मुळे ती केवळ दक्षिणेतच नाही, तर देशभरातील घराघरात पोहोचली. अल्लू अर्जूनसह तिची केमिस्ट्री अनेकांना भावली. सोशल मीडियावर, विविध वृतांमध्ये रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून संबोधलं (National Crush Rashmika Mandanna) म्हणून संबोधलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का की रश्मिकाचा क्रश कोण आहे. तर 'विजय' आहे रश्मिकाचा क्रश! पण विजय देवरकोंडा नव्हे तर दुसराच एक विजय रश्मिकाचा क्रश आहे. हा अभिनेता देखील दाक्षिणात्य सुपरस्टार (Rashmika Mandanna Crush) आहे. रश्मिका त्याला तिचा ड्रीम हिरो समजते आणि तिची या हिरोसह काम करण्याची इच्छा आहे. लक्षात आलं का कोण आहे हा अभिनेता? हे वाचा-'मराठीतून सांगितलेलं कळत नाही..'; रिंकू राजगुरुचा डायलॉग म्हणताना Jacqueline Fernandez चा Video Viral या 'विजय'ची फॅन आहे रश्मिका अभिनेत्री रश्मिका एका प्रसिद्ध हिरोची फार मोठी चाहती आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून साऊथ सुपरस्टार 'मास्टर' फेम थालापती विजय (Master Vijay)  आहे. हो हे खरं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना विजयची फार मोठी चाहती आहे. रश्मिकाला विजयसोबत काम करण्याची फार इच्छा आहे. 'पुष्पा' फेम या अभिनेत्रीने स्वतः आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे. रश्मिकाने 'भीष्म' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हटलं होतं, तमिळ सुपरस्टार थालपती विजय तिचा तिचा फार मोठा क्रश आहे. तिला त्याच्यासोबत काम करायचं आहे. खऱ्या आयुष्यात पाहायला गेलं तर अभिनेत्री आणि तिचा सहकलाकार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्याच आलं आहे. विजय आणि रश्मिकाने (Vijay Devarkonda and Rashmika Mandanna Movie) 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले होते. यामधील रश्मिका आणि विजयची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडली होती. या दोन्ही चित्रपटांनंतर चाहते या दोघांना रिअल लाइफ कपल म्हणून पाहतात. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची अधिकृत माहिती अद्याप दोघांपैकी कुणीच दिलेली नाही. हे वाचा-'तारीख पे तारीख' डायलॉग लिहणाऱ्याच एका वर्षाचा तुरुंगवास, धक्कादायक आहे कारण बॉलिवूडमध्ये पदार्पणसाठी सज्ज Birthday Girl! पुष्पामधून देशभरातून चाहते कमावलेले ही 'श्रीवल्ली' आता बॉलिवूडमध्येही (Rashmika Bollywood Movie) जम बसवण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभ बच्चनसोबत गुड बाय या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसह Animal सिनेमातही दिसणार आहे. रश्मिकाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. तिने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर करत अशी कॅप्शन दिली आहे की, 'चांगला दिवस चांगल्या बातमीसह येतो'. तिने या पोस्टमध्ये 'उगडी' आणि 'गुढी पाडवा' संदर्भात GIFs ही वापरल्या आहेत. रणबीर आणि रश्मिका एकत्र दिसणार म्हटल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यासाठी ती सध्या मुंबईमध्येच दिसून येते. तसेच अभिनेता विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता लवकरच अनन्या पांडेसोबत 'लायगर' या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rashmika mandanna

    पुढील बातम्या