मुंबई, 6 जून : प्रत्येक सुपरस्टारची स्ट्रगल स्टोरी असते. शाहरुख पासून सलमान पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या सुरुवातीच्या काळात खूप मेहनत घ्यावी लागली आहे. अभिनेता रणवीर सिंहला सुद्धा त्याच्या सुरूवातीच्या काळात अशाच प्रकारच्य स्ट्रॅगलला सामोरं जावं लागलं आहे. रणवीर आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त सध्या रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो रणवीर बॉलिवूडचा सुपरस्टार झाल्यानंतर समोर आला होता. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे, जेव्हा रणवीरनं त्याची पहिली ऑडिशन दिली होती. हा व्हिडिओ खूप हिट झाला. आतापर्यंत जवळपास 4.9 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
रणवीरच्या या पहिल्या ऑडिशनच्या व्हिडिओमध्ये खूपच यंग दिसत असला तरी त्याचा विनोदी स्वभाव मात्र आता आहे तसाच त्यावेळीही होता. या व्हिडिओमध्ये काही इतर लोकही दिसत आहेत जे त्यावेळी ऑडिशनला आले होते. सर्वजण सांगितल्या प्रमाणे अभिनय करतात मात्र रणवीर असं काही करतो ज्यामुळे तिथे असलेले सर्वांनाच हसू फुटतं. रणवीरचा त्यावेळीचा विनोदी स्वभाव अद्याप तसाच आहे. तो एक यशस्वी अभिनेता आहे त्यासोबतच एक चांगली व्यक्ती सुद्धा आहे. कदाचित त्याच्या या स्वभावानंच त्याला सुपरस्टार बनवलं आहे. रणवीरचा अभिनयच नाही तर त्याचा फॅशन सेन्स सुद्धा खूप चांगला आहे. त्यामुळे तो सध्या बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
परिणितीनं असं पूर्ण केलं Bottlecapchallenge, हा व्हिडिओ एकदा पाहाच
रणवीरचं पूर्ण नाव रणवीर सिंह भवनानी असून त्यानं त्यानं सुरुवातीच्या काळात जाहीरातीसाठी कॉपी रायटरचं काम कामही केलं आहे. त्याला पहिला ब्रेक 2010मध्ये बँड बाजा बारातमध्ये मिळाला. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू मिळाला होता. यानंतर रणवीरनं कधीच मागे वळून बघितलं नाही. त्याने एका मागोमाग एक असे सिनेमे दिले जे त्याच्या करिअरमध्ये माइलस्टोन ठरले.
हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर
View this post on Instagram
रणवीरच्या करिअरमधील बेस्ट सिनेमांमध्ये ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला रामलीला’ अशा सिनेमांचा समावेश आहे. याशिवय तिचा सोनाक्षी सिन्हा सोबतचा त्याचा लुटेरा हा सिनेमा सुद्धा खूप गाजला होता. रणवीरनं फक्त नायकच नाही तर खलनायक सुद्धा उत्तम रितीनं साकारला होता. पद्मावत मधील खिलजीची भूमिका रणवीरनं ज्याप्रकारे साकारली त्यातून त्याचं अभिनय कौशल्य दिसून आलं. रणवीर ज्याप्रमाणे त्याच्या स्टाइलमध्ये वेळोवेळी बदल करतो तसंच तो अभिनयातही करत असतो. त्याचा हाच अंदाज त्याला एक यशस्वी अभिनेता म्हणून सिद्ध करतो.
वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट