• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: फक्त 'Bigg Boss'चं नव्हे तर राहुल वैद्यने या कार्यक्रमांतसुद्धा घेतला होता सहभाग

HBD: फक्त 'Bigg Boss'चं नव्हे तर राहुल वैद्यने या कार्यक्रमांतसुद्धा घेतला होता सहभाग

राहुल वैद्यचा जन्म २३ सप्टेंबर १९८७ मध्ये नागपुर महाराष्ट्र येथे मराठमोळ्या कुटुंबात झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर- राहुल वैद्य(Rahul Vaidya) हे आज एक लोकप्रिय नाव बनलं आहे. सध्या सोशल मीडियावरसुद्धा त्याची जोरदार हवा आहे. 'बिग बॉस १४'(Bigg Boss 14) ने या गायक स्पर्धकाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. या गायकाने 'इंडियन आयडॉल १' पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख 'बिग बॉस'ने मिळवून दिली आहे. आज राहुल आपला ३४ (34Th Birthday Today) वा वाढदिवस साजरा करत आहे.
  राहुल वैद्यचा जन्म २३ सप्टेंबर १९८७ मध्ये नागपुर महाराष्ट्र येथे मराठमोळ्या कुटुंबात झाला आहे. म्हणजेच हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख बनवणारा राहुल वैद्य एक मराठी मुलगा आहे. राहुलचे वडील वीज महावितरणकेंद्रात एक इंजिनियर होते. राहुल मुंबईमध्येच लहानाचा मोठा झाला आहे. राहुलने अनेक शोमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र त्याला ओळख 'बिग बॉस १४'ने मिळवून दिली आहे. या शोमध्ये प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आहे. तो रनरअप ठरला होता. त्यानं ट्रॉफी जिंकली नसली तरी त्यानं लोकांची मन जिंकली आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अनेक शोजमध्ये सहभाग- 'बिग बॉस १४' ने राहुल वैद्यला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली असली. तरी राहुलने फक्त बिग बॉसमध्येच सहभाग घेतला नव्हता. तर राहुलने याआधीसुद्धा अनेक शोमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. २००४ मध्ये आलेल्या इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात राहुल वैद्यने सहभाग घेतला होता. यावेळी मराठमोळा अभिजित सावंत विजेता ठरला होता. तर राहुल वैद्य दुसरा रनरअप ठरला होता. त्यांनतर राहुलने 'जो जिता वही सुपरस्टार', 'म्युजिक का महामुकाबला' या शोमध्ये सहभाग घेतला होता. इतकंच नव्हे तर तो या शोमध्ये विजेता ठरला होता. तसेच राहुलने 'झूम इंडिया' आणि 'आजा माही वे'सारखे शो होस्टदेखील केले आहेत. (हे वाचा:Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक) बिग बॉस १४ ने दिली लोकप्रियता- राहुल वैद्य 'बिग बॉस १४' मध्ये सहभागी झाला होता. या शोमुळे राहुल एका रात्रीत लोकप्रिय झाला होता. राहुल या शोचा रनरअप ठरला होता. मात्र लोकांनी राहुलला प्रचंड प्रेम दिल होतं. या शोमध्ये राहुलची अली गोनीसोबत फारच छान मैत्री पाहायला मिळाली होती. शो नंतरसुद्धा अनेकवेळा हे दोघे एकत्र लंच आणि डिनर घेताना दिसले होते. तसेच बिग बॉसमध्ये राहुलने अभिनेत्री दिशा परमारवर आपलं प्रेम असल्याचं कबूल केलं होतं. त्यांनतर तिच्याशी लग्नसुद्धा केलं आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi: स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी; ट्विट करत म्हटलं..) खतरों के खिलाडीमध्ये सहभाग- 'बिग बॉस'च्या प्रचंड लोकप्रियतेनंतर राहुल वैद्यला 'खतरों के खिलाडी १११' साठी अप्रोच करण्यात आलं होतं. राहुलने या शोमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. यामध्ये सुद्धा त्याने आपली विशेष छाप पडली आहे. यामध्ये तो टॉप ५ फायनलीस्टमध्ये पोहोचला होता. अर्जुन बिजलानी या शोचा विजेता ठरला होता.
  Published by:Aiman Desai
  First published: