मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rahul Dev B'day: कित्येक वर्षांपासून मराठमोळ्या मुग्धा गोडसेसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात राहुल देव; अद्यापही का केलं नाही लग्न?

Rahul Dev B'day: कित्येक वर्षांपासून मराठमोळ्या मुग्धा गोडसेसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात राहुल देव; अद्यापही का केलं नाही लग्न?

राहुल-मुग्धा

राहुल-मुग्धा

हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारुन प्रेक्षकांवर आपली एक विशेष छाप पाडणारा अभिनेता म्हणजे राहुल देव होय. राहुल देव आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 सप्टेंबर-   हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारुन प्रेक्षकांवर आपली एक विशेष छाप पाडणारा अभिनेता म्हणजे राहुल देव होय. राहुल देव आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. राहुल देव यांचं व्यावसायिक आयुष्य जितकं खास आहे तितकंच त्यांचं खाजगी आयुष्यदेखील रंजक आहे. आपल्या खाजगी आयुष्यातील कोनतीही गोष्टी त्यांनी कधी कोणापासून लपवली नाही. ते एक सिंगलफादर असून मॉडेल-अभिनेत्री मुग्धा गोडसेसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात . राहुल आणि मुग्धा लग्न कधी करणार यांची दोघांच्याही चाहत्यांना उत्सुकता आहे.

एक उंच गोरा, देखणा खलनायक अशी राहुल देव यांची ओळख आहे. राहुल देव यांचा जन्म 1968 मध्ये दिल्लीत झाला होता. त्यांचं शिक्षणसुद्धा दिल्लीत पूर्ण झालं आहे. राहुलचे वडील एक सहाय्यक पोलिस आयुक्त होते. राहुलचा भाऊ मुकुल देवही सिनेसृष्टीशी निगडीत आहे. राहुल यांच्या पत्नी रीना देव यांचं कॅन्सरने निधन झालं होतं. त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगादेखील आहे. सन 2000 मध्ये सनी देओलच्या 'चॅम्पियन' या चित्रपटातून राहुलने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

राहुल यांचं आपल्या पत्नी रीना देववर प्रचंड प्रेम होतं. 2009 मध्ये जेव्हा त्यांच्या पत्नी रीना यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता, तेव्हा राहुल भावनिकरित्या पूर्णपणे कोसळले होते. राहुलला समजत नव्हतं की ते आपल्या 11 वर्षाच्या मुलाचा सांभाळ कसा करणार. राहुलसाठी हा काळ खूप कठीण होता. याच कठीण काळात एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मुग्धा गोडसेशी भेट झाली.मुग्धा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती प्रियांका चोप्राच्या 'फॅशन' चित्रपटातून प्रचंड लोकप्रिय झाली होती.

भेटीगाठीदरम्यान मुग्धा आणि राहुल दोघांनाही एकमेकांचा स्वभाव फारच आवडला होता. वयात मोठं अंतर असूनही दोघांमधील बॉन्डिंग खूपच चांगचं होतं. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. आणि त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. राहुल देव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी सिंगल फादर असल्याने मुग्धासोबत माझं नातं ऑफिशियल करण्याआधी मी संकोच करत होतो. पण मी माझ्या मुलाला माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं होतं. 2015 मध्ये मुग्धा आणि राहुलने आपलं नातं ऑफिशियल केलं होतं. या दोघांच्या खुलाश्याने सर्वच चकित झाले होते.

(हे वाचा:Kareena Kapoor: करीना कपूरच्या व्हॅनिटीची व्हॅनची झालीये अशी अवस्था; नेमकं काय घडलं? )

विशेष म्हणजे राहुल आणि मुग्धा बरेच दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. पण दोघांनी अद्यापही लग्न केलेलं नाहीय. अशा स्थितीत दोघांनाही अनेकदा लग्नाबाबत विचारणा केली जाते. यावर राहुल आणि मुग्धा दोघांचं म्हणणं आहे की, आम्हाला लग्नाची गरज वाटत नाही. आम्ही दोघेही आमच्या या आयुष्यात फार आनंदी आहोत. एका चांगल्या नात्यासाठी आवश्यक ते सर्व आमच्याकडे आहे.त्यामुळे आम्हाला अद्यापही लग्नाची गरज भासली नाही. त्यामुळे भविष्यातसुद्धा हे दोघे लग्नाबाबत विचार करणार की नाही यात अनेकांना शंका वाटते.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment