मुंबई 10 जुलै : प्रसिद्ध टीव्ही शो ‘डान्स इंडिया डान्स’ (Dance India Dance) (DID) मधून घराघरात पोहचलेला डान्सर राघव जुयाल (Raghav Juyal) आता एक अभिनेता देखील आहे. नृत्यातून राघवने मोठी ओळख निर्माण केली आहे.
राघवचा जन्म 10 जुलै 1991 ला उत्तराखंडमध्ये एका पहाडी कुटुंबात झाला होता. राघवला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती मात्र त्याने कोणताही प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं नव्हतं. (Dancer Raghav Juyal)
अखेर तैमूरच्या भावाच झालं बारसं; वाचा काय आहे करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव
2011 साली त्याने ‘चक धूम धूम’ या शो मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याची नृत्याची आवड समोर आली. राघवने कोणतही ट्रेनिंग न घेता फक्त टीव्ही आणि इंटरनेटवरील व्हिडिओज पाहून नृत्याभ्यास केला होता.
View this post on Instagram
यानंतर राघव ‘डान्स इंडिया डान्स 3’ (DID3) या शोमध्ये दिसला. त्यात तो दुसरा रनरअप (second runnerup) ठरला होता. त्यानंतर त्याला मोठी प्रसिद्धी मिळू लागली. यानंतर तो विविध भूमिकांसाठी डान्स इंडिया डान्सच्या अनेक पर्वात दिसला.
View this post on Instagram
‘डान्स प्लस’, ‘दिलं है हिंदूस्तानी’ यासारख्या अनेक शो मध्ये तो जज म्हणूनही दिसला होता. याशिवाय ‘बिग बॉस’ (Big Boss) मध्येही गेस्ट म्हणून त्याने 2 वेळा हजेरी लावली आहे. सध्या तो डान्स दिवाने या शो चाही होस्ट आहे.
Hot मलायकाचा Monochrome अवतार; 25 वर्षांपूर्वी या फोटोंनी उडवली होती खळबळ
डान्स आणि होस्टींग शिवाय त्याने काही चित्रपटांत ही काम केलं आहे. त्यामुळे राघव ने एक डान्सर म्हणून नाही तर अभिनेता म्हणून ही ओळख निर्माण केली आहे. सोनाली केबल, एबीसीडी 2, नवाबजादे, स्ट्रीट डान्सर 3d, बहुत हुआ सम्मान यात तो दिसला होता तर लवकरच तो ‘वेडलॉक’ आणि ‘युध्र’ या चित्रपटांतही दिसणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Dancer, Entertainment