• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Happy Birthday Preity Zinta: 'डिंपल गर्ल'वर लहानपणीच कोसळला होता दुःखाचा डोंगर

Happy Birthday Preity Zinta: 'डिंपल गर्ल'वर लहानपणीच कोसळला होता दुःखाचा डोंगर

बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी प्रीती झिंटा (Priety Zinta) रविवारी 45 वर्षांची होते आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊ या.

 • Share this:
  मुंबई, 31 जानेवारी : चुलबुली, हसरी प्रिटी झिंटा (Preeti Zinta) बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' (dimple girl) म्हणून ओळखली जाते. या गालावर खळी पडणाऱ्या गोड अभिनेत्रीचा उद्या आहे वाढदिवस. 31 जानेवारीला ही चिरतरुण अभिनेत्री 45 वर्षांची होईल. प्रीती बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींपैकी (Bollywood actress) एक आहे. प्रीतीनं आजवर 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'कोई मिल गया', 'सलाम नमस्ते', 'वीर झारा' अशा एकाहून एक हिट सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. मागच्या काही वर्षांपासून प्रीती सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी इतर विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे. आता प्रीती अमेरिकेत (America) असते. तिथं ती पती (husband) जीन गुडइनफसोबत राहते. प्रीतीचा जन्म शिमल्याचा. 31 जानेवारी 1975 मध्ये ती शिमल्यामध्ये (Shimla) जन्मली. तिच्या आई-वडिलांचं नाव नीलप्रभा आणि दुर्गानंद झिंटा आहे. प्रीतीचे वडील भारतीय लष्करात (Indian Army) ऑफिसर होते. प्रीती केवळ 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा कार अपघातात (Car accident) मृत्यू झाला. यात तिची आईही (mother) गंभीर जखमी झाली होती. यामुळे ती तब्बल दोन वर्ष अंथरुणात होती. खूप काळ उपचार केल्यावर त्या बऱ्या झाल्या. या अपघाताचा प्रीतीच्या जगण्यावरही खूप परिणाम झाला. ती लहान असतानाच मनानं बरीच प्रौढ झाली. प्रीतीचं शालेय शिक्षण शिमल्याच्या कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी स्कूलमध्ये झालं. यानंतर तिनं शिमल्याच्या सेंट बेडे कॉलेजमधून शिक्षण घेतलं. प्रीती बॉलिवूडमधल्या उच्चशिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं पदवी शिक्षण इंग्लिश ऑनर्स आणि पदव्युत्तर शिक्षण क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये घेतलं. 1996 साली एका मित्राच्या बर्थडे पार्टीत प्रीतीची भेट एका दिगदर्शकाशी झाली. या व्यक्तीनं प्रीतीला चॉकलेटच्या जाहिरातीत काम करण्याची ऑफर दिली. या जाहिरातीनंतर तिनं इतरही अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. 1997 मध्ये शेखर कपूर यांनी प्रीतीला एका ऑडिशनमध्ये पाहून अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला. 'सोल्जर' हा हिट सिनेमा दिल्यावर प्रीतीनं मागं वळून पाहिलं नाही.
  Published by:News18 Desk
  First published: