बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Aroro) हिचा आज वाढदिवस आहे. मलायका आज 47 व्या वर्षात पदार्पण करत असून तिच्या फिगर आणि लुकमुळे ती आजही तरुणच दिसते.
बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Aroro) हिचा आज वाढदिवस आहे. मलायका आज 47 व्या वर्षात पदार्पण करत असून तिच्या फिगर आणि लुकमुळे ती आजही तरुणच दिसते.
मुंबई, 23 ऑक्टोबर: बॉलिवूडमधील मॉडेल, अभिनेत्री आणि उत्तम डान्सर असणाऱ्या मलायका अरोरा (Malaika Aroro)हिचा आज वाढदिवस आहे. मलायका आज 47 व्या वर्षात पदार्पण करत असून तिच्या फिगर आणि लूकमुळे ती आजही तरुणच दिसते. 1997 मध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होतं. MTV वर रेडिओ जॉकी म्हणून तिने आपली कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक व्हिडिओ अल्बम गाण्यांमध्ये तिने डान्स केला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील देखील अनेक गाण्यांमध्ये तिने डान्स केला आहे. शाहरुख खान याच्याबरोबरच्या ‘छैया छैया’ या गाण्यामधून ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
मलायकाने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. तिच्या फिटनेसमुळे हे शक्य झाल्याचे चाहते म्हणतात. अभिनेत्री नेहमी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती योगाभ्यास, व्यायाम याबाबत तिच्या चाहत्यांना नेहमी अपडेट करत असते. फिटनेससाठी मलायका ओळखली जाते. आज तिच्या वाढदिवशी तिच्या इंस्टाग्रामवरील काही फिटनेस फोटोंवर नजर टाकूया.
नुकताच तिने परिवृत्त पार्श्वकोनासन (Parivrtta Parsvakonasana) करताना फोटो अपलोड केला होता. यामध्ये तिने हे आसन कशा पद्धतीनं केले जाते हे देखील सांगितले आहे. यामध्ये तिने योग करणाऱ्यांना तिला आपल्या व्हिडिओमध्ये टॅग करण्याचे देखील आवाहन केले आहे.
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
तिच्या या दुसऱ्या पोस्टमध्ये ती नौकासन (Naukasana) करताना दिसून येत आहे. यामध्ये ती पोटाचे फॅट कमी करण्यासाठी या आसनाचा फायदा होत असल्याचे सांगितले आहे.
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
कोरोनातून बरे झाल्यानंतर तिने केलेल्या पोस्टमध्ये मलायका त्रिकोणासन (Trikonasana) करताना दिसून येत आहे. यामध्ये हे आसन शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगताना दिसून येत आहे.
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
ओणमच्या मुहूर्तावर मलायकाने अष्टावक्रासन (Astavakrasana) करताना तिचा फोटो शेअर केला होता.यामध्ये ती विटांच्या मदतीने हे आसन करताना दिसून येत आहे. शरीरासाठी हे आसन अत्यंत महत्त्वाचे आहे.
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
सध्या मलायका एका टीव्ही चॅनेलवरील डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. India's Best Dancer असे या डान्स शोचे नाव असून यामध्ये ती गीता कपूर आणि टेरेन्स लुईस याच्याबरोबर दिसून येत आहे. परंतु कोरोना झाल्यानंतर तिच्या जागेवर नोरा फतेही हिने काही काळ परीक्षक म्हणून काम केले होते.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.