मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकर आणि हेमांगी कवी यांचं आहे खास नातं; अभिनेत्रीनेच केला खुलासा

Lata Mangeshkar Birthday : लता मंगेशकर आणि हेमांगी कवी यांचं आहे खास नातं; अभिनेत्रीनेच केला खुलासा

Hemangi kavi

Hemangi kavi

अभिनेत्री हेमांगी कवीच लतादीदींसोबत नक्की काय आहे नातं जाणून घ्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 28 सप्टेंबर :  आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती आहे. सगळ्या देशभरात आज त्यांची आठवण काढली जात आहे. कलाक्षेत्रात 6 दशकाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या लता दीदींसोबत प्रत्येक जणांचं एक खास नातं असत. आपल्या गाण्यांमधून त्या प्रत्येकापर्यंत पोहचतात. प्रत्येकाला त्या आपल्याशा वाटतात.  अनेक कलाकार मंडळी सुद्धा त्यांच्याबद्दल पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणी जाग्या करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी कायम चर्चेत असते. आज तिने लता दीदींच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तीच आणि लता दीदींचं एक खास नातं आहे त्याविषयी तिने खुलासा केला आहे. नेमकं काय म्हटलंय हेमांगीने जाणून घ्या.

अभिनेत्री हेमांगी कवीने लता दीदींच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लतादीदींचा एक जुना फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ''मला जर कुणी विचारलं दैवी म्हणजे काय तर मी म्हणेन, ‘हा आवाज’... जादू म्हणजे काय तर हा आवाज,निखळ, नितळ, तरल म्हणजे काय तर हा आवाज, शाश्वत म्हणजे काय तर हा आवाज! आमचं भाग्य ज्या शतकात हा आवाज जन्माला आला त्याच शतकात, काळात आम्ही जन्माला आलो! धन्य धन्य झालो आम्ही!''

पुढे तिने लता दीदींशी असलेल्या नात्याविषयी खुलासा केला आहे. तिने लिहिलंय कि, ''आपण लहान माणसं अश्या महान व्यक्तींशी काही न काही साम्य जोडत असतो. आवाजाची साम्यता जोडायला मला १० जन्म घ्यावे लागतील पण तुमचं पहीलं आणि खरं नाव ‘हेमा’ आहे कळल्यावर मला किती किती धन्य वाटलं होतं काय, कसं सांगू?... हेमा/ लता मंगेशकर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!''

हेही वाचा - Lata Mangeshkar Birth Anniversary: संगीताला दैवत मानणाऱ्या लता दीदी गायनाआधी करायच्या 'हे' काम; वाचून बसणार नाही विश्वास

हेमांगीची ही पोस्ट वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. हेमांगीचे चाहते सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. हेमांगी नेहमीच अशा वेगवेगळ्या पोस्ट करत असते. तिच्या या पोस्टमध्ये प्रत्येकवेळी काहीतरी खास असतं.

नुकतीच नवरात्रीनिमित्त तिने केलेली पोस्टसुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. हेमांगीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर ती, अलीकडे 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटात झळकली होती. येणाऱ्या काळात ती ओटीटी क्षेत्रात पण पाऊल ठेवणार आहे. रवी जाधव यांच्या वेब सिरीजमध्ये हेमांगी झळकणार आहे.

First published:

Tags: Lata Mangeshkar - लता मंगेशकर, Marathi actress