मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Happy Birthday Katrina Kaif: विकी कौशलशी लग्न झाल्यानंतर कतरिनाच्या संपत्तीत वाढ? जाणून घ्या अभिनेत्रीचं नेट वर्थ

Happy Birthday Katrina Kaif: विकी कौशलशी लग्न झाल्यानंतर कतरिनाच्या संपत्तीत वाढ? जाणून घ्या अभिनेत्रीचं नेट वर्थ

कतरिना कैफ प्रत्येक फिल्मसाठी किती पैसे घेते हे माहित आहे का?

कतरिना कैफ प्रत्येक फिल्मसाठी किती पैसे घेते हे माहित आहे का?

कतरिना कैफ प्रत्येक फिल्मसाठी किती पैसे घेते हे माहित आहे का?

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 15 जुलै: कतरीना कैफ ही अभिनेत्री उद्या म्हणजेच 16 जुलैला 39 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. जवळपास चाळीशीत आलेल्या या अभिनेत्रीची सुंदरता, फिटनेस या सगळ्या गोष्टी चाहत्यांना आजही घायाळ करणाऱ्या आहेत. सध्या कतरिनाचं नाव एकट्याने घेतलं जात नाही तर सोबत विकी कौशलचं नाव ओघाने येतंच. विकीशी लग्न केल्यानंतर कतरिनाच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. सध्या कतरीनाकडे किती संपत्ती आहे?

कतरिनाची संपत्ती नेमकी किती आहे?

कतरिनाची नेट वर्थ आताच्या घडीला 218 कोटींच्या घरात आहे असं सांगितलं जातं. कतरिना प्रत्येक फिल्मसाठी जवळपास 7-8 करोड रुपये घेते अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. दोनशेहून अधिक कोटींची मालकीण असणारी कतरिनाची बॉलिवूडमधील हायेस्ट पेड अभिनेत्रींनमध्ये वर्णी लागते असं सुद्धा सांगितलं जातं. तसंच कतरिना अनेक ब्रॅण्ड्ससोबत सुद्धा जोडलेली आहे. कतरिनाने आजपर्यंत करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

कतरिनाच्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये मॉडेलिंगमुळे झाली. तिचा पहिला सिनेमा बूम अपयशी ठरला पण हळूहळू तिची एंट्री बॉलिवूडमध्ये झाली. आज कतरीना एक यशस्वी अभिनेत्री आहे तसंच तिचं फॅन फॉलोईंग सुद्धा जबरदस्त आहे.

हे ही वाचा- Katrina Kaif: कतरिनाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी विकीने निवडलं 'हे' ठिकाण; लग्नानंतरचा पहिला वाढदिवस असणार खास

कतरिनासाठी मागचं वर्ष फारच खास ठरलं याचं कारण तिचं विकीशी झालेलं लग्न. विकी आणि कतरिना यांचा डिसेंबर महिन्यात अगदी खाजगी पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लव्हस्टोरीचे डिटेल्स मात्र अजूनही नीटसे समोर आलेले नाहीत. या दोघांनीही कॉफी विथ करणच्या मंचावर एकमेकांचा उल्लेख केला होता. विकी आणि कतरिनाचं हे कपल सध्या सगळ्या चाहत्यांच्या आवडीचं ठरत आहे. सध्या विकी आणि कतरिना कॅटचा वाढदिवस साजरा करायला मालदीवला गेले असल्याचं समोर येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

वर्क फ्रंटवर सध्या कतरिना जोर पकडताना दिसत आहे. अनेक दिवसांनी फोन भूत नावाच्या सिनेमातून ती कमबॅक करणार आहे. या चित्रपटाची तारीख नुकतीच बदलली असून आता हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.

First published:

Tags: Birthday celebration, Bollywood actress, Katrina kaif