Birthday Special : वयाच्या 19 व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत कतरिनानं दिला होता लिपलॉक सीन

Happy Birthday Katrina Kaif : हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी कतरिनासोबतच्या लिपलॉक सीनमुळे हा अभिनेता रातोरात चर्चेत आला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 07:06 PM IST

Birthday Special : वयाच्या 19 व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत कतरिनानं दिला होता लिपलॉक सीन

मुंबई, 16 जुलै : अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या कतरिनाला या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. तिच्या करिअरची सुरुवात तितकीशी खास नव्हती. कतरिनानं 2003 मध्ये बूम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता मात्र या सिनेमातील कतरिनानं दिलेल्या बोल्ड सीनची चर्चा मात्र फार झाली होती. बोल्ड सीन व्यतिरिक्त कतरिनानं गुलशन ग्रोवर सोबत दिलेला किसिंग सीन सुद्धा विशेष गाजला होता.

‘बूम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणाऱ्या कतरिनानं पदार्पणातच अभिनेता गुलशन ग्रोवर सोबत लिपलॉक सीन दिला होता. या सीनची सर्वत्र खूप चर्चा तर झालीच शिवाय हा सीन प्रचंड वादातही सापडला होता. असा सीन शूट करणं खरं तर गुलशन यांच्यासाठीही सोपं नव्हतं. याचा खुलासा गुलशन ग्रोवर यांनीच त्यानंतर दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला होता.

VIDEO : गुरूच्या दोन्ही शनाया 'सोपं कोडं' सोडवायला एकत्र

Loading...

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

गुलशन यांनी ‘बूम’ सिनेमातील कतरिनासोबतचा किसिंग सीन त्यांच्या करिअर मधील सर्वात कठीण सीन असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी ते एकटेच एका बंद खोलीमध्ये प्रॅक्टीस करत असत. असंच एक दिवस त्याठिकणी अमिताभ बच्चन गुलशन यांना भेटायला आले होते. मात्र गुलशन यांना प्रॅक्टीस करताना पाहून ते निघून गेले. बिग बी निघून गेल्यानंतर या सीनबाबत माझ्यावर असलेला ताण अधिकच वाढला होता असंही या मुलाखतीमध्ये गुलशन यांनी सांगितलं होतं.

....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय

2003 मध्ये आलेला ‘बूम’ बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर जवळपास 4 वर्षांचा ब्रेक घेत कतरिना 2007 मध्ये आलेल्या ‘नमस्ते लंडन’ या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात कतरिनानं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. भले त्यावेळी तिला हिंदी येत नसल्यानं डबिंग करताना अनेक समस्या आल्या मात्र या सिनेमानंतर कतरिनानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. यानंतर तिनं ‘पार्टनर’, ‘अजब प्रेम की गजब काहानी’, ‘सिंग इज किंग’, ‘एक था टायगर’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘भारत’ असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

सनी लिओनीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा? नवऱ्यासोबत फोटो केला शेअर

सध्या कतरिना तिचा आगामी सिनमा सूर्ववंशीच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनमामध्ये ती अक्षय कुमार सोबत स्क्रिन शेअर करणार असून रोहित शेट्टी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचं शूट पार पडलं. हे गाणं अक्षय कुमारच्या 'मोहरा' सिनेमातील असून आता ते सूर्ववंशीमध्ये रिक्रिएट केलं जात आहे.

===================================================

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 08:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...