• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट सोडला होता चित्रपट

HBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट सोडला होता चित्रपट

करिना कपूर (Kareena Kapoor) आज आपला ४० वा वाढदिवस साजरा(Birthday Today) करत आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- करिना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री (Bollywood Actress) समजली जाते. या अभिनेत्रीने अनेक दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा कस दाखवून दिला आहे. ही अभिनेत्री आज आपला ४० वा वाढदिवस साजरा(Birthday Today) करत आहे. यानिमित्ताने तिच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया. करिना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर १९८० मध्ये मुंबई येथे झाला होता. करिना कपूर ही मनोरंजनसृष्टीला मोठं योगदान देणाऱ्या कपूर कुटुंबातील आहे. अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची ती लहान मुलगी आहे. तर अभिनेत्री करिश्मा कपूरची ती लहान बहीण आहे. त्यामुळे करिना कपूरला जन्मजातच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. असं म्हटलं जात की करिनाने अभिनयासाठी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. करिना कपूरने सन २००० मध्ये जे. पी. दत्ता यांच्या 'रिफ्यूजी' या चित्ररपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
  या चित्रपटामध्ये करिनासोबत अभिनेता अभिषेक बच्चननेसुद्धा अभिनयाला सुरुवात केली होती. हा चित्रपट भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्शवभूमीवर आधारित होता. यामध्ये करिनाने नाज या बांग्लादेशी तरुणीची भूमिका साकारली होती. तर अभिषेकने रिफ्यूजी या तरुणाची भूमिका साकारली होती. जो तरुण अवैधरित्यापाकिस्तान सीमेवरून लोकांना इकडून तिकडे ने आण करत असे. आपल्या सर्वांना असंच माहिती आहे की 'रिफ्यूजी' हाच करिनाचा पहिला चित्रपट आहे. पण असं नाहीय. (हे वाचा:सर्जरीऐवजी निवडला असा मार्ग; रेमो डिसूजाच्या पत्नीने घटवलं 2 वर्षांत 40 किलो वजन) या चित्रपटाच्या आधी करिना कपूरला राकेश रोशन यांचा 'कहो ना प्यार है' हा चित्रपट मिळाला होता. यामध्ये अभिनेता हृतिक रोशन तिचा सह अभिनेता होता. या चित्रपटासाठी करिनाने अर्ध शूटिंगसुद्धा केलं होतं. मात्र त्यांनतर करिनाने हा चित्रपट सोडून दिला होता. असं सांगितलं जातं की या चित्रपटामध्ये राकेश रोशन आपला मुलगा हृतिक रोशनवर जास्त लक्ष केंद्रित करत होते. त्यामुळे नाराज होऊन करिनाने हा चित्रपट अर्धवट सोडून  दिला होता. करिनानंतर या चित्रपटात अमिषा पटेलची वर्णी लागली होती. मात्र हा चित्रपट आणि यातील गाणी सुपरहिट ठरली होती. (हे वाचा:VIDEO:रोहित शेट्टीने माधुरीला उंदीर पकडायला सांगितलं;धकधक गर्लची झाली अशी अवस्था) मात्र आज करिना कपूरसुद्धा सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. करिनाने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. आज प्रत्येक अभिनेता करिनासोबत काम करण्याचं स्वप्न पाहतो. वयाच्या चाळीशीतहि करिना तितकीच सुंदर आणि फिट आहे. करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं आहे. तर या जोडप्याला  तैमूर आणि जहाँगीर अशी दोन गोंडस मुले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: