Home /News /entertainment /

कबीर बेदींनी केली चार लग्नं, पहिल्या पत्नीच्या न्यूड फोटोंनी घातला होता धुमाकूळ!

कबीर बेदींनी केली चार लग्नं, पहिल्या पत्नीच्या न्यूड फोटोंनी घातला होता धुमाकूळ!

कबीर बेदी यांची पहिली पत्नी प्रोतिमा ही सिनेब्लिट्स मासिकाच्या या फोटोशूटसाठी मुंबईच्या बीचवर न्यूड धावली होती.

    मुंबई, 16 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांचा आज 74 वा वाढदिवस. त्याचा जन्म 16 जानेवारी 1946 ला अविभाजित भारताच्या लाहोर शहरात झाला. पण भारताची फाळणी झाल्यानंतर ते मॉडेलिंग आणि अभिनयाचं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आले. ‘ताजमहल’ सिनेमातून आपल्या सिनेकरिअरची सुरुवात करणारे कबीर बेदी त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच सुपरहीट सिनेमा दिले मात्र त्यांचं पर्सनल लाइफ खूपच वादग्रस्त राहिलं. कबीर बेदी यांनी एक-दोन नाही तर तब्बल 4 लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न खूपच घाई-गडबडीत झाली होती. एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अंबा सन्याल नावाच्या एका मुलीशी कबीर यांच्या साखरपुडा झाला होता. पण त्याचवेळी ते 19 वर्षीय मॉडेल प्रोतिमा गुप्तासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान प्रोतिमा गुप्ता गरोदर राहिली आणि कबीर यांनी अंबा सन्यालशी साखरपुडा मोडून प्रोतिमाशी लग्न केलं. त्यानंतर प्रोतिमा आणि कबीर यांची मुलगी पूजा बेदीचा जन्म झाला. ‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज एक वृत्तपत्रानं असाही दावा केला होता की, पूजा बेदीच्या जन्माच्या 8 महिन्यांनंतर कबीर यांच्या पहिल्या पत्नीचं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जर्मन मुलाशी सूत जुळलं. लग्नाच्या 5 वर्षांनातर प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला. प्रोतिमा एक क्लासिकल डान्सर आणि मॉडेल होती. पण अचानक त्यांनी हे सर्व सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्या कैलाश मानसरोवर यात्रेवर गेल्या पण यावेळी झालेल्या लॅन्ड स्लाइडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मलायका अरोराचं नवं फोटोशूट व्हायरल, HOT अँड BOLD अंदाजावर चाहते फिदा 1974 मध्ये प्रोतिमा यांचा न्यूड फोटो सिनेब्लिट्स मासिकावर छापला होता. या मासिकाला चर्चेत येण्यासाठी एका अशा बोल्ड मुलीची गरज होती. जी बीचवर न्यूड धावताना पोझ देईल. जेव्हा या मासिकाच्या संपादकानं प्रोतिमाला याबाबत विचारणा केली त्यावेळी तिनं या फोटोशूटला होकार दिला. प्रोतिमा या फोटोशूटसाठी मुंबईच्या बीचवर न्यूड धावली होती. तिच्या या फोटोंनी खूप त्यावेळी खूपच धुमाकूळ घातला होता. पहिल्या पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर कबीर बेदी यांचं नाव ब्रिटीश फॅशन डिझायनर सुझान हम्फ्रेस हिच्याशी जोडलं गेलं. त्यानंतर काही दिवसातच या दोघांनी लग्न केलं मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कबीर बेदी टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्कीला भेटले त्यानंतर 1992 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र याची परिणीती सुद्धा पहिल्या दोन लग्नांसारखीच घटस्फोटात झाली. बाजारात अ‍ॅसिड मिळतं का? दीपिकाने असं समोर आणलं धक्कादायक वास्तव त्यानंतर बरीच वर्ष कबीर बेदी सिंगल होते. मात्र वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी परवीन दोसांज हिच्याशी चौथं लग्न केलं परवीन एक टीव्ही प्रोड्युसर आहे. या दोघांनी जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केलं आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. कबीर यांची चौथी पत्नी परवीन ही त्यांची मुलगी पूजा पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. परवीनशी लग्न केल्यानंतर कबीर आणि त्यांच्या मुलीतील संबंध बिघडले असं म्हटलं जातं. ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार मराठमोळा अभिनेता
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Kabir Bedi

    पुढील बातम्या