मुंबई 16 जून : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाझ अली (Imtiaz Ali) यांचा आज जन्मदिवस. अनेक सुपरहीट चित्रपट देऊन इम्तियाझ यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण असाही काळ होता जेव्हा ते चोरून चित्रपट पाहायचे. दिग्दर्शक बनण्याचा त्यांचा प्रवास हा लहानपणापासून सुरू झाला होता.
इम्तियाझ अली यावर्षी त्यांचा 50 वाढदिवस साजरा करत आहेत. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तिथेच त्यांचं बालपणही गेलं. शालेय दिवसांत ते नाटकांत सहभाग घ्यायचे. त्यांना नाटक लिहिण्याची तसेच त्याला दिग्दर्शित करण्याचीही आवड होती. हळू हळू ते चित्रपटांतही रस घेऊ लागले. व चित्रपट पाहू लागले. त्यांना जणू चित्रपट पाहण्याचा छंदच लागला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांना चित्रपट पाहण्यापासून रोखायचे.
View this post on Instagram
इम्तियाझ अली यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते तिथे राहायचे त्या घराच्या शेजारीच थिएटर होतं. इम्तियाझ यांच्या काकांची जमशेदपूरमध्ये तीन टॉकीज होती. तिथे ते कुटुंबियांच्या मनाविरूद्ध चित्रपट पाहायला जायचे. आपल्या काकांचच टॉकिज असल्याने त्यांना तिकीट काढावं लागत नव्हतं.
मल्लिका शेरावतचा अमेरिकेतील बंगला पाहिलात का? किती अलिशान घरात राहते अभिनेत्री
पुढे त्यांनी सांगितलं होतं की, ते ज्या घराशेजारी राहायचे तिथेच टॉकीज होतं. त्यामुळे त्यांच्या घराच्या एका खिडकीतूनही थिएटरमधील चित्रपट थोड्याफारप्रमाणात दिसायचा. पण निट पाहिलं तर पूर्णही दिसायचा. तेथून ते चोरून चित्रपट पाहायचे. त्यांचा चित्रपट पाहण्याचा छंद इतका वाढला होता की ते एकदा 9 वीच्या वर्गात नापासही झाले होते.
इम्तियाझ यांच्या कुटुंबियांनी कधीही त्यांच मनोबल ढासळू दिलं नाही. नेहमीच त्यांना सपोर्ट केला. असही त्यांनी सांगितलं होतं. शालेय शिक्षणानंतर ते दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये पदवी शिक्षणासाठी गेले. तिथे ते ड्रामा क्लबचे सदस्य बनले. त्यानंतर त्यांचा मुंबईला येण्याचा प्रवास सुरू झाला.
सोचा न था चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जब व्ही मेट, रॉकस्टर सारखे सुपरहीट चित्रपट त्यांनी दिले. आज बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment