• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लिखाणासाठी सोडला होता अभिनय; गुरू ठाकूर असे झाले प्रसिद्ध लेखक

लिखाणासाठी सोडला होता अभिनय; गुरू ठाकूर असे झाले प्रसिद्ध लेखक

गुरू ठाकूर यांनी आपल्या लेखनीतून, कवितेंतून जणू रसिक मनांवर मोठं गारुड केलं आहे. मग ते कवितेपासून , गाण्यांपर्यत ते पटकथेपर्यत सर्वच प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै : गुरू ठाकूर (Guru Thakur) हे नाव जवळपास प्रत्येक वयोगटातील रसिक प्रेक्षकांना माहीत आहे. आपल्या लेखनीतून, कवितेंतून त्यांनी जणू रसिक मनांवर मोठं गारुड केलं आहे. मग ते कवितेपासून , गाण्यांपर्यत ते पटकथेपर्यत सर्वच प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एका गोष्टीसाठी का होईना गुरू ठाकूर यांचं नाव नक्की ऐकायाला मिळतं. ठाकूर यांचा जन्म 18 जुलैला मुंबईत झाला होता. त्यांनी वर्तमान पत्रातील कॉलमनिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली होती. काही वर्तमान पत्रात ते लिहायचे. तरुण भारत, पुढारी, नवाकाळ, महाराष्ट्र टाइम्स, मासिके, दैनिके यात ते लिहायचे. सुरुवातीपासूनच लेखनाचा हा जणू छंदचं त्यांच्या अंगी होता. पण इतकच नाही तर अभिनयातही ते तरबेज होते. तर आपण लेखक होण्याआधी एक अभिनेता आहोत असही त्यांनी म्हटलं होतं.
  कॉलमनिस्ट पासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी एक यशस्वी कवी, पटकथा लेखक, कार्टुनिस्ट/ व्यंगचित्रकार, वॉइस ओव्हर आर्टिस्ट, गीतकार अशा वेगवेगळ्या रुपात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

  मीठ- भाकरी खाऊन काढले होते दिवस; वाचा खळखळून हसवणाऱ्या भारती सिंगची अश्रु आणणारी संघर्षगाथा

  श्रीयुत गंगाधर टिपरे या झी मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकेचं लिखाणही त्यांनी केलं होतं. ‘अग्गबाई अरेच्चा’, ‘भय्या हात पाय पसरी’, ‘नटरंग’ अशा सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं होतं. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटातील ‘हे राजे जी रं जीजी’ हे सुपरहीट गीतही त्यांनीच लिहिलं होतं.
  नटरंग चित्रपटातील ‘खेळ मांडला’ गाणं आजही श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतं, तेही ठाकूर यांनी लिहिलं होतं. यानंतर ‘लय भारी’ चित्रपटातील ‘माऊली माऊली’ हे गाणंही सुपरहिट ठरलं होतं. ते देखील ठाकूर यांनी लिहिलं होतं. ठाकूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की “खरं तर मी एक अभिनेता आहे, मी काही प्रोजेक्टही केले आहेत. मला अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी सुचवलं की, मी लेखमावर जास्त लक्षकेंद्रीत करायला हवं. कारण त्यांना मी यात चांगला वाटत होतो. ते म्हणाले एका प्रोजेक्टसाठी अनेक अभिनेते तयार असतात पण लेखणासाठी असं म्हणता येणार नाही. त्यामुळे गीते लिहिण्यासाठी मी माझं अभिनय क्षेत्र सोडलं होतं.”
  Published by:News Digital
  First published: