Home /News /entertainment /

Giaa Manek Birthday: 'या' एका चूकीमुळे 'गोपी बहू' फेम जिया मानेक झाली होती मालिकेतून OUT

Giaa Manek Birthday: 'या' एका चूकीमुळे 'गोपी बहू' फेम जिया मानेक झाली होती मालिकेतून OUT

छोट्या पडद्यावरील (Tv Actress) 'गोपी बहू' (Gopi Bahu) म्हणजेच जिया मानेक (Giaa Manek) आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झाली होती. जिया मानेकला आजही 'गोपी बहू' म्हणूनच ओळखलं जातं.

  मुंबई, 18 फेब्रुवारी-  छोट्या पडद्यावरील   (Tv Actress)  'गोपी बहू'   (Gopi Bahu)  म्हणजेच जिया मानेक (Giaa Manek)  आपल्या पहिल्याच  मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झाली होती. जिया मानेकला आजही 'गोपी बहू' म्हणूनच ओळखलं जातं. जिया मानेक आज तिचा 36 वा वाढदिवस   (Giaa Manek Birthday)   साजरा करत आहे. 18 फेब्रुवारी 1986 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे तिचा जन्म झाला होता. जिया एका गुजराती कुटुंबातील लेक आहे. सोशल मीडियावर चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 'साथ निभाना साथिया' या मालिकेतून अभिनेत्रीने करिअरची सुरुवात केली होती. 'गोपी बहू' या व्यक्तिरेखेमुळे जिया मानेकला मोठी पसंती मिळाली होती. अतिशय गोंडस आणि निरागस दिसणाऱ्या जिया मानेकला स्वतःचीच एक चूक भोवली होती.   2012 मध्ये जिया मानेकने 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. वास्तविक, साथ निभाना साथियाच्या निर्मात्यांना जिया मानेकने त्या शोमध्ये सहभाग घ्यावा असे वाटत नव्हते. जेव्हा निर्मात्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी जिया मानेकला तातडीने शोमधून बाहेर काढले होते. जिया मानेक झलक दिखला जा जिंकू शकली नाही.  आणि दुसरीकडे लोकप्रिय मालिकाही तिच्या हातातून गेली. त्यांनतर अनेक वर्षे जियाला फारसं  विशेष काही करता आलं नाही. अखेर 2019 मध्ये ती 'मनमोहिनी' या मालिकेतून पुन्हा झळकली. आता जिया मानेक 'तेरा मेरा साथ रहे' मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा गोपिका बहूच्या भूमिकेत आहे. या मालिकेत प्रेक्षक तिला चांगली पसंती देत आहेत. मालिकांमध्ये  एंट्री करण्यापूर्वी जिया मानेक 'ना घर के ना घाट के' चित्रपटातही दिसली आहे. एप्रिल 2012 मध्ये, जिया मानेक तिची आई आणि काही मित्रांसह एका प्रसिद्ध हुक्का रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. त्यावेळी पोलिसांनी तेथे छापा टाकला.  पोलिसांच्या छाप्यात जिया मानेक थोडक्यात बचावली होती. पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, जिया आणि तिचे मित्र हुक्का रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यामुळे त्यांना कोणताही दंड न भरता जाण्याची परवानगी देण्यात यावी'.
  View this post on Instagram

  A post shared by Gia Manek (@gia_manek)

  मात्र, यामुळे अभिनेत्रीच्या प्रतिमेला मोठा  तडा गेला होता. 'साथ निभाना साथिया'च्या निर्मात्यांनी तिला मालिकेतून बाहेर काढण्याचं हे खरं असल्याचंसुद्धा म्हटलं जातं. यानंतर बिग बॉस 1४ च्या निर्मात्यांनी तिला शोसाठी संपर्क साधला. पण नंतर शोमध्ये तिच्या जागी रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांना आणण्यात आले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या